AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...

हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा…

| Updated on: Jul 22, 2026 | 7:34 PM
Share

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर झालेल्या लाठीमार नंतर काल पुन्हा एकदा आंदोलन चिघळलं होतं. तरुण आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा सर्वच स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मोदींच्या निवासस्थानी धरणे आंदोलन सुरू केलं

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर झालेल्या लाठीमार नंतर काल पुन्हा एकदा आंदोलन चिघळलं होतं. तरुण आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा सर्वच स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मोदींच्या निवासस्थानी धरणे आंदोलन सुरू केलं. तसेच प्रत्येक देशवासियांना मोदींच्या घरासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं. राहुल गांधी यांनी ट्विट करून हे आवाहन केलं होतं मात्र अचानक राहुल गांधींचं आंदोलन चिघळल्याचं समोर आलं.आंदोलनस्थळी पोलीस दाखल झाले आणि त्यांनी आंदोलकांना ताब्यात घेण्यसा सुरुवात केली. यावेळी त्यांनी राहुल गांधींनाही ताब्यात घेतलं कारण मंत्र्यांनी येऊन चर्चा केल्यानंतरही पंतप्रधांनाच्या निवासस्थानाबहेर आंदोलन सुरू होतं याबाबत आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

शिंदे म्हणाले, “राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आहेत मोठ्या पदावर आहेत त्यामुळे त्यांचं कालंच आंदोलन हे अत्यांत बेजबाबदारपणाचं होतं. तुम्ही आंदोलन करता मान्य मात्र चुकीच्या ठिकाणी करता. तुम्ही आंदोलनासाठी ठिकाण चुकीचं निवडलंत. जर असं काही नाही तर तुम्हाला पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर घातपात करायचा होता का?” शिंदेच्या या विधानाने एकच खळबळ उडाली आहे.

Published on: Jul 22, 2026 07:17 PM

Follow Us
Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?.

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल.

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान.

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?