Bhaskar Jadhav : 32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा, पुढे म्हणाले….
भास्कर जाधव यांनी 32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकल्याचे सांगितले. त्यांच्या मते, ही क्लिप राजकीय मित्रांना, पत्रकारांना कसे लक्ष्य केले जाते, खोटे कथानक कसे पसरवले जाते आणि विरोधकांना संपवण्यासाठी हजारो कोटी कसे खर्च केले जातात, हे उघड करते. त्यांनी भाजपच्या दुहेरी भूमिकेवर आणि मराठा आरक्षणाच्या इतिहासावरही भाष्य केले.
शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी एका 32 मिनिटांच्या क्लिपबाबत केलेल्या विधानांनी महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. ही क्लिप आपण पुन्हा पुन्हा ऐकल्याचे जाधव यांनी नमूद केले. त्यांच्या मते, ही क्लिप देशातील लोकांशी कसे वागले जाते, राजकीय मित्रांना, पत्रकारांना कसे लक्ष्य केले जाते, खोटे कथानक कसे पसरवले जाते आणि विरोधकांना संपवण्यासाठी हजारो कोटी रुपये कसे खर्च केले जातात, हे स्पष्टपणे दाखवते.
या क्लिपमध्ये एकनाथ शिंदे, मनोज जरांगे पाटील, पत्रकार आणि अन्य विरोधी पक्षाचे नेते यांनाही सोडण्यात आले नसल्याचे जाधव यांनी सांगितले. खोटे बोलून सत्ता कशी मिळवली जाते, हे दुष्टचक्र या क्लिपमध्ये समोर आल्याचा त्यांचा दावा आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना जाधव यांनी, 2013-14 साली नारायण राणेंच्या अध्यक्षतेखालील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारनेच पहिले 16 टक्के आरक्षण दिले होते, असे म्हटले. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर मराठा समाजाला फसवल्याचा आरोप करत, आरक्षणाला प्रमुख नेत्यांचा विरोध असल्याचा सूचक दावाही केला.
Published on: Oct 24, 2026 04:16 PM
32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा....
जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया....
आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; जरांगेंनी सांगितली मराठा..

