AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..

Maharashtra Weather Update : राज्यातील काही भागात पावसाने हाहाकार माजवला आहे. मुसळधार पाऊस काही जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. आजही भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा जाहीर केला.

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..
Maharashtra Rains, Weather Update
| Updated on: Jul 23, 2026 | 7:32 AM
Share

राज्यातील काही भागात पावसाने हाहाकार माजवला. रात्रभर पाऊस झाला. त्यामध्येच आजही भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. पु्ण्याच्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. थेट रेड अलर्ट जारी करण्यात आला. नाशिक घाटमाथा, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. काही जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टीही जाहीर केली. मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, यवतमाळ, अकोला, चंद्रपूर या जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. पण मुंबईमध्ये रात्रभर पाऊस होता. शिवाय अनेक भागात पावसाचा हाहाकार उडाला. पालघरमध्ये मोठा पूर आला. मुंबईसह उपनगरांमध्ये पाऊस कायम आहे. दिवसभर सोसाट्याच्या वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

या सततच्या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांपैकी एक असलेल्या तानसा जलाशय भरून ओव्हरफ्लो झाले. विहार आणि तुळसी आता तानसा तलावही ओसंडून वाहू लागला आहे. यामुळे मुंबईतील सातपैकी तीन तलाव पूर्ण भरले आहेत. सर्व जलाशयांमधील एकत्रित पाणीसाठा एकूण क्षमतेच्या 62 टक्क्यांवर पोहोचला आहे. ज्यामुळे आता पाणीकपातीचे संकट टळले आहे.

मुंबई, ठाणे, कल्याण, डोबिंवली, बोरिवली, अंधेरी, बदलापूर, अंबरनाथ, पनवेल, पालघर, भिवंडी या परिसरात रात्रभरपासून पाऊस सुरू आहे. मुंबई, पुण्यासह अन्य काही जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासाता पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भातही पावसाने हजेरी लावली. ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

पालघरमध्ये पावसाचा जोरदार पाऊस सुरू आहे. हडाणू ते विवर लोकलसेवा पूर्णपणे ठप्प आहे. यासोबतच आवश्यक कामांशिवाय घराबाहेर पडणे टाळा, असेही आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या सोसाट्याच्या वारासह मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालय तसेच अंगणवाड्यांना जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली.

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील वारणा चांदोली खोऱ्यात व पाथरपुंज येथे सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली. वारणा धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. आज गुरुवारी 23 जुलै सकाळी 6 वाजेपर्यंत धरण 75.13 टक्के भरले असून एकूण पाणीसाठा 25.84 टीएमसी इतका झाला आहे.

पालघर जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाने दमदार अशी हजेरी लावली. आज डहाणू आणि तलासरी तालुक्यांमधील जनजीवन विस्कळीत झाल्याच पाहायला मिळतंय. मुसळधार बरसणाऱ्या पावसामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आला असून अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. सारणी उर्से ऐना या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पुराच पाणी आल्याने उर्से सह परिसरातील 15 ते 16 गावपाड्यांचा मुख्य बाजारपेठेशी संपर्क तुटला आहे.

जिल्ह्यात आज देखील मुसळधार पावसाची शक्‍यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली असून खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सूर्या नदी काठावरील 64 ते 65 गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे .

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच