AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, अतिमुसळधार पावसाचा इशारा, पुढील 24 तासात थेट..

Maharashtra Weather Update : राज्यात मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यामध्येच आज भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. पुढील 24 तास अत्यंत धोक्याची असून रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट विविध भागांमध्ये देण्यात आला.

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, अतिमुसळधार पावसाचा इशारा, पुढील 24 तासात थेट..
Maharashtra Weather
| Updated on: Jul 22, 2026 | 9:26 AM
Share

मोठ्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा जोरदार पावसाला सुरूवात झाली. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. आता पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरूवात झाली. मुंबईसह उपनगर, पुणे, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि विदर्भातील काही शहरांमध्ये जोरदार पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. मुंबईमध्ये काल रात्रीपासून पाऊस सुरू आहे. त्यामध्येच आजही भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. भारतीय हवामान विभागाने मुंबईमध्ये आज 22 जुलै 2026 रोजी पावसाचा येलो अलर्ट जारी केला. पुढील 24 तासात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रोहतक सिधी रांची ते दिघा वायव्य उपसागरापर्यंत 1.5 किलोमीटर उंचीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला.

अरबी समुद्रापासून दक्षिण गुजरात, राजस्थान, ओडिसा, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश ते बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. आज भारतीय हवामान विभागाकडून पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला. ठाणे, रायगड, पालघर, नाशिक आणि सातारा घाटमाथा, कोल्हापूर येथे अतिमुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला.

या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. मुंबई, पुणे, रत्नागिरी, नाशिक, विदर्भ या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला. वादळी वाऱ्याचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. कालपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू झाला. कडवा, भावली आणि पालखेड धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात.

कडवा धरणातून 374 क्युसेक, भावली धरणातून 1,218 क्युसेक, तर पालखेड धरणातून 1,392 क्युसेक पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन. कालपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात अनेक भागांत संततधार पाऊस कायम. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस; धरणांतील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ. पुन्हा एकदा जोरदार पाऊस हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

जालना जिल्ह्यात मध्यरात्रीपासून अनेक भागांत रिमझिम पावसाची संततधार सुरू असून पहाटेपर्यंतही पावसाची रिपरिप कायम असल्याच पाहायला मिळत आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला असून, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. यावर्षी पावसाच्या अनियमिततेमुळे सोयाबीन,कापूस, तूर, मका यासारख्या पिकांबाबत शेतकरी चिंतेत होते.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...