हवामान
समान्यपणे रोजच्या तापमानाला हवामान असं म्हटलं जातं. वातावरणातील बदल हा सुद्धा हवामानाचा एक भाग आहे. भारतात उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा हे चार ऋतू आहेत. रोजचं वातावरण कसं असेल? यंदाचा पावसाळा कसा असेल? वादळ येणार की नाही? आलं तर कुठपर्यंत येईल? वातावरणातील बदल काय असणार? याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला जातो. त्यानुसार शेतकरी आपली तयारी करत असतात. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे हवामान खात्याकडून हवामानाबाबतचा वेळोवेळी इशारा दिला जातो.
Read MoreWeather updat : महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना पावसाचा हाय अलर्ट, काम असेल तरच घराबाहेर पडा, पंजाबराव डख यांचा मोठा इशारा
महाराष्ट्रात पावसाचं पुनरागमन झालं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान आता राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख (Weather expert Punjabrao Dakh) यांच्याकडून काही जिल्ह्यांना मोठा इशारा देण्यात आला आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Sep 14, 2026
- 10:14 pm
IMD Maharashtra Weather Update : आज गणेशचतुर्थी कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? मुंबई-पुण्यात पाऊस कोसळणार का?
IMD Maharashtra Weather Update : गणेशोत्सवाला सुरुवात होण्याच्या बरोबर एक दिवस आधी काल मुंबापुरीत जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे आज आणि पुढचे दहादिवसही असाच पाऊस कोसळणार का? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. त्याचं उत्तर जाणून घ्या.
- Dinananth Parab
- Updated on: Sep 14, 2026
- 8:50 am
Mumbai Rain Updates | मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर मुंबईत पावसाने हजेरी लावली आहे. दादरसह शहर आणि उपनगरात सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर आलेल्या या पावसाने नागरिकांना दिलासा मिळाला असून, पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Sep 13, 2026
- 1:33 pm
Mumbai Rain Updates | मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुसळधार पावसाची हजेरी
मुंबईत दीड महिन्यांच्या विश्रांतीनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मलबार हिल आणि दादरसह शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी, गणेशोत्सवाच्या तोंडावर खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या गणेश भक्तांना मात्र अडचणींचा सामना करावा लागत आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Sep 13, 2026
- 12:59 pm
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
नाशिकमध्ये पुढील तीन तासांसाठी हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नाशिककरांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- प्रिती वेद
- Updated on: Sep 13, 2026
- 10:20 am
Maharashtra Rain : बाप्पा पावला, पावसाने ताल धरला! मुंबईसह राज्याला पावसानं झोडपले, 20 जिल्ह्यांना मोठा अलर्ट
Maharashtra Heavy Rain: बाप्पााच्या आगमनापूर्वी मुंबईसह राज्याला पावसानं झोडपलं. पाऊस पुन्हा धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला. या 20 जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यासह खानदेश विदर्भातील अनेक जिल्हे आणि भागांना पावसाची मोठी आस आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Sep 13, 2026
- 9:30 am
Weather Update : मोठी गुड न्यूज, राज्यात मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना हाय अलर्ट, पंजाबराव डख यांचा मोठा इशारा
राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. गेल्या महिनाभरापासून राज्यात पाऊसच झाला नसल्यामुळे चिंता वाढली होती, मात्र आता दिलासादायक बातमी समोर आली आहे. हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख (Weather expert Punjabrao Dakh) यांचा नवा अंदाज समोर आला आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Sep 12, 2026
- 8:33 pm
Maharashtra News LIVE : हवामान विभागाच्या वतीने गोंदिया जिल्ह्याला पावसाचा अलर्ट
Maharashtra News LIVE : आज मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईत धडकणार आहे. याबाबत बोलताना जरांगे म्हणाले की, राज्यभरातील मराठा समाजाने 12 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता आंतरवालीत यावे. आम्हाला अडवले तर अख्खा महाराष्ट्र ठप्प करू.
- आरती बोराडे
- Updated on: Sep 12, 2026
- 8:52 pm
IMD Rain Alert : सावधान व्हा… या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट, महाराष्ट्रात…
बंगालच्या खाडीत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने रुसलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे. हवामान खात्याने महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा, छत्तीसगडसह देशातील अनेक राज्यांमध्ये 11 ते 17 सप्टेंबरदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता असून, पुढील ७ दिवस सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
- manasi mande
- Updated on: Sep 11, 2026
- 7:12 pm
Washim Soyabean Farmer Issue | वाशिममध्ये पावसाअभावी खरीप पिकांची अवस्था बिकट
वाशिम जिल्ह्यात गेल्या ४५ दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांची, विशेषतः सोयाबीनची, मोठी हानी झाली आहे. शेतकरी हवालदिल झाले असून, हजारो रुपये खर्चून उभे केलेले पीक डोळ्यादेखत करपून जात आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी शासनाकडे त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
- प्रिती वेद
- Updated on: Sep 11, 2026
- 3:28 pm
weather update : महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, पुढील 24 तासांत या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, पंजाबराव डख यांचा मोठा इशारा
पावसासंदर्भात एक दिलासादायक बातमी आहे. राज्यात पुढील 24 तासांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख ( Weather expert Punjabrao Dak) यांचा नवा हवामान अंदाज समोर आला आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Sep 10, 2026
- 8:31 pm
IMD Weather Update : बंगालच्या खाडीत काय घडतंय? विदर्भाला अलर्ट, महाराष्ट्रात पाऊस कधी?
बंगालच्या खाडीतील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ओडिशा, छत्तीसगडसह अनेक राज्यांना 11 ते 15 सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. उत्तर भारतातही जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात 12 ते 14 सप्टेंबर दरम्यान मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे. मात्र, महाराष्ट्रात पुढील चार दिवस मान्सून कमकुवत झाल्याने पाऊस नसेल, ज्यामुळे तापमानात वाढ होईल.
- भीमराव गवळी
- Updated on: Sep 10, 2026
- 4:29 pm