AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD Weather Alert : देशासह राज्यावर मोठ संकट, पुन्हा अवकाळी पावसाचा मोठा इशारा, तब्बल..

Weather update : राज्यासह देशातील वातावरणात मोठा बदल होताना दिसतोय. कधी पाऊस तर कधी उष्णतेचा चटका अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला आहे.

IMD Weather Alert : देशासह राज्यावर मोठ संकट, पुन्हा अवकाळी पावसाचा मोठा इशारा, तब्बल..
Unseasonal rain
| Updated on: Mar 12, 2026 | 7:25 AM
Share

हवामानात सातत्याने मोठे बदल होत आहेत. यादरम्यान राज्यात थेट पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. ऐन मार्च महिन्यातही पाऊस होणार आहे. अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला. सतत हवामानात बदल होताना दिसत आहे. आजही अनेक शहरात सकाळपासूनच पावसाचे वातावरण निर्माण झाले. ढगाळ वातावरण दिसत आहे. मुंबईमध्ये पुन्हा एकदा घातक हवा झाली. मुंबईमधील प्रदूषणात मोठी वाढ झाली. पाऊस, प्रदूषण आणि मध्ये मध्ये उन्हाचा कडाका अशी स्थिती निर्माण झाली. पुणे, नांदेड, बीड, परभणी येथे अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. शनिवारी लातूर धाराशिवमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. यासोबतच जोरदार वारेही यादरम्यान वाहण्याची शक्यता आहे. गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यांतील काही भागात विजांचा कडकाडाटासह पाऊस होईल.

मार्च महिन्यातही भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस होताना दिसला. त्यामध्येच आता पुन्हा एकदा पावसाचा मोठा इशारा वर्तवण्यात आला. काही दिवसांपूर्वीच राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामध्येच आता पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला.

काल दिवसभर हवामानात मोठा चढउतार बघायला मिळाला. उकाडा अधिक जाणवत होता. सकाळी पुन्हा वातावरणात मोठा बदल झाला. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज राज्यात हवामानात चढउतार बघायला मिळेल. काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. कोकणात उष्णता अधिक वाढेल आणि उष्ण वातावरण अधिक राहण्याचा अंदाज आहे.

काही भागात आजही पारा 40 च्या पार जाण्याची शक्यता आहे. मात्र, राज्यातील सर्वच भागात हवामानात बदल दिसतील. विदर्भात उन्हाचा कडाका अधिक जाणवत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 37 च्या पार आहे. यामध्येच अवकाळी पावसामुळे उष्णतेपासून थोडातरी दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली. देशातील इतर राज्यात पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

Follow Us
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?