Indian Railways News: रेल्वेची डोअर-टू डोअर पार्सल सेवा, आता मोबाईलवर होणार काम,रांगेची गरज नाही…
प्रवाशांनी त्यांच्या सामानाची सुरक्षित पॅकींग करणे, ज्वलनशील, विस्फोटक वा प्रतिबंधित वस्तूंना बुकींग न करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

रेल्वेने आता त्यांच्या पार्सल सेवेला अधिक सोपे, आधुनिक आणि ग्राहक केंद्री बनवण्यासाठी रेल्वे पार्सल ऐप्सद्वारे घर ते घरापर्यंत सुरुवात केली आहे. मोबाईल आणि वेबसाईट दोन्ही माध्यमातून उपलब्ध होणारी या सुविधेमुळे आता ग्राहकांना पार्सल बुक करण्यासाठी रेल्वे स्थानकात लाईल लावण्याची गरज राहणार नाही.
सुरुवातीला ही रेल्वे पार्सलची अत्याधुनिक सेवा देशाच्या आठ प्रमुख शहरात होणार आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, हैदराबाद आणि बंगळुरु येथे ही सेवा सुरु होणार आहे. त्यानंतर टप्प्या टप्प्याने ही सेवा संपूर्ण देशात सुरु केली जाणार आहे. या डिजिटल पावलाने छोटे व्यापारी, शेतकरी, कारागिर आणि ई-कॉमर्स विक्रेत्यांना माफक दरात घर बसल्या सुगम परिवहनाचा लाभ घेता येणार आहे.
कशी काम करणार डोअर टू डोअर सेवा
या सेवेला तीन टप्प्यात विभागले आहे. फर्स्ट माईलमध्ये रेल्वेशी जोडलेल्या लॉजिस्टीक्स पार्टनर ग्राहकाच्या घर वा कार्यालयातून पार्सल पिक करणार आहेत. मिडल माईलमध्ये रेल्वेद्वारे पार्सलना सुरक्षित पणे त्यांच्या गंतव्यस्थानी पोहचवले जाईल. लास्ट माईलमध्ये गंतव्य स्थानक ते लॉजिस्टीक पार्टनर या पार्सला प्राप्तकर्ता याच्या घराच्या पत्त्यावर या पोहचवतील.
ऐप्सची प्रमुख वैशिष्ट्ये काय ?
ग्राहक मोबाईल क्रमांकाने नोंदणी करुन पार्सलची माहिती नोंदवतील आणि युपीआय, कार्ड वा नेट बँकींगद्वारे एकदाच संपूर्ण पैसे म्हणजे रेल्वे भाडे वा पिकअप डिलिव्हरी शुल्क देतील. डिजिटल फॉर्वर्डिंग नोट आणि ओटीपी आधारित व्यवस्था असेल. ज्यामुळे फिजिकल वे -बिलाची गरज लागणार नाही. प्रत्येक पार्सलला १० अंकाचा विशेष ट्रॅकींग नंबर दिला जाईल. ज्यामुळे पार्सलची लाईव्ह लोकेशन आणि प्रत्येक टप्प्याची अपडेट मोबाईलवर मिळेल. पार्सल डिलिव्हरी संपूर्णपणे ओटीपी आधारे केली जाईल.
बुकिंग संबंधीत नियम
पार्सलची बुकिंग ट्रेन सुटण्याच्या निर्धारित वेळेच्या १५ दिवस आधी ते किमान एक दिवस आधी करता येईल. पिकअपच्या आधी बुकींग रद्द केल्यानंतर नियमानुसार पैसे रिफंड केले जातील. ग्राहकांना त्यांच्या सामानाची सुरक्षित पॅकींग करणे, ज्वलनशील, विस्फोटक वा प्रतिबंधित वस्तूंना बुकींग न करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
