AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD Weather Alert : पाऊस पुन्हा कोसळणार! 9 जिल्ह्यांवर संकट, थेट विजांच्या कडकडाटासह…

भारतीय हवामान विभागाकडून अत्यंत मोठा इशारा देण्यात आला. आज राज्यातील अनेक भागात उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आला. मार्च महिन्यातही राज्यात पावसाचे ढग कायम असून अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.

IMD Weather Alert : पाऊस पुन्हा कोसळणार! 9 जिल्ह्यांवर संकट, थेट विजांच्या कडकडाटासह...
Heavy rain alert
| Updated on: Mar 11, 2026 | 7:17 AM
Share

राज्यातील हवामानात सातत्याने मोठे बदल होत आहेत. फेब्रुवारी महिन्यात कधी पाऊस, उन्ह तर थंडी अशी स्थिती होती. मार्च महिन्याच्या सुरूवातीपासूनच हवामानात मोठे बदल होताना दिसले. तापमानात मोठी वाढ झाली असून अनेक जिल्ह्यांमध्ये पारा 40 च्या पार आहे. राज्यात उकाडा वाढलेला असतानाच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा अंदाज वर्तवला आहे. राज्यात पुढील 4 दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला. उष्णता वाढलेली असतानाच थेट पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील काही तास अवकाळी पाऊस विजांच्या कडकाडाटासह कोसळेल. यासोबतच काही भागात उष्णतेचा अलर्टही देण्यात आला. कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा येलो अलर्ट भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला.

येणाऱ्या शनिवारी लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडाकडाटासह पावसाचा अंदाज आहे. यवतमाळ आणि चंद्रपूरमध्ये विजांच्या कडकाडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. फक्त शनिवारीच नाही तर येणाऱ्या रविवारी देखील नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांतील काही भागात विजांचा कडकाडटासह पाऊस होईल. यावेळी मोठ्या प्रमाणात वारेही सुटण्याचा अंदाज आहे.

यासोबतच पुणे, नांदेड, बीड, परभणी येथील वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. दुसरीकडे मुंबईसह कोकणात उष्णता आणि दमट वातावरणात वाढ होण्याचा अंदाज आहे. राजस्थानच्या फतेहपूरमध्ये देशातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. फेतेहपूरमध्ये 1.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. गुजरातच्या राजकोट येथे देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. 41.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

मंगळवारी अमरावती, वाशिम, ब्रह्यपुरी, सोलापूर, जळगाव, यवतमाळ येथे 39 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद निफाड येथे झाली. निफाडमध्ये 12.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. आज भारतीय हवामान विभागाकडून राज्यातील अनेक भागात उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. पालघर, रायगड आणि मुंबई जिल्ह्यांमध्ये दमट आणि आणि उष्ण हवामानाचा येलो अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी शक्यतो महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडणे टाळावे.

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...