AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dadar | दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा महासागर; आदित्य ठाकरे-अमित ठाकरे एकाच मंचावर

Dadar | दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा महासागर; आदित्य ठाकरे-अमित ठाकरे एकाच मंचावर

| Updated on: Jul 24, 2026 | 5:16 PM
Share

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये आंदोलनाला सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले असून, मुंबई आणि परिसरातील हजारो विद्यार्थी या ठिकाणी जमले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे सहभागी होणार आहेत. विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे शिवाजी पार्क परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

दरम्यान, आंदोलनाचा एक भाग म्हणून राष्ट्रगीत गायनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, त्याचे आयोजन आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये एकात्मता आणि आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

दिल्लीतील NEET पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात विविध ठिकाणी आंदोलन होत असताना, मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये सुरू झालेले हे आंदोलनही विशेष चर्चेचा विषय ठरत असून, याकडे राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 24, 2026 05:16 PM

Follow Us