शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा! मायक्रो फायनान्स कंपन्यांनाबाबत ओमराजे निंबाळकरांचा मोठा इशारा
ओमराजे निंबाळकर यांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या मनमानी कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कर्जवसुलीच्या अमानवी पद्धतींवरून त्यांनी कंपन्यांना फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्यांसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन करत सरकारने या कंपन्यांवर बंधनकारक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
कर्जवसुलीच्या अमानवी पद्धतींवरून ओमराजे निंबाळकर यांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीचा गैरफायदा घेऊन मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून सुरू असलेल्या पिळवणुकीवर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. निंबाळकर म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आधीच संकटात आहेत. अशा परिस्थितीत मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून सुरू असलेली सक्तीची वसुली अमानवी आहे. दिवसभरात येणाऱ्या फोनपैकी ७० टक्के फोन हे मायक्रो फायनान्सच्या वसुलीचे असतात, असे उदाहरण देत त्यांनी गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधले.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून वसुली थांबवण्याची मागणी केली असून, जिल्हाधिकाऱ्यांनाही या संदर्भात सूचना दिल्या आहेत. ज्या मायक्रो फायनान्स कंपन्या सक्तीने किंवा अमानवी पद्धतीने वसुली करतील, त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई केली जाईल, असा इशारा निंबाळकर यांनी दिला. प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले.
Published on: Oct 26, 2026 07:17 PM
शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा! मायक्रो फायनान्स कंपन्यांनाबाबत ओमराजे...
CSMT वर रेल्वेचा खोळंबा! लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या गाड्याही 2 तास उशिर
राज्य सरकारने आनंदाचा शिधा योजना बंद केल्यानंतरही शिवसेनेकडून...
आता 100 टक्के इथेनॉलवर धावणार गाड्या! केंद्र सरकारचा मोठा निर्णय,

