CSMT वर रेल्वेचा खोळंबा! प्रवाशांची प्रचंड गर्दी, लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या गाड्याही 2 तास उशिराने
मध्य रेल्वेची सेवा सीएसएमटी स्थानकात मोठ्या प्रमाणात उशिराने धावत आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याचे म्हटले जात असले तरी, संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी बाहेर जाणारे गाड्या दोन तास तर येणारे गाड्या एक तास उशिराने धावत आहेत. यामुळे प्लॅटफॉर्मवर आणि स्टेशनबाहेर प्रवाशांची प्रचंड गर्दी जमली आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकावर मध्य रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणावर उशिराने धावत असल्याने प्रवाशांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. टीव्ही ९ मराठीच्या वृत्तानुसार, CSMT वर सध्या प्रवाशांची मोठी गर्दी जमली आहे. बाहेरगावी जाणाऱ्या गाड्या सुमारे दोन तास उशिराने धावत आहेत, तर मुंबईत येणाऱ्या गाड्यांनाही एक तासाहून अधिक उशीर होत आहे. रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत असले तरी, प्रत्यक्षात अजूनही काही कामे बाकी असल्याची माहिती समोर आली आहे.
संध्याकाळच्या पीक अवरमध्ये, म्हणजे कार्यालयातून परतणाऱ्या प्रवाशांच्या वेळी, ही परिस्थिती निर्माण झाली आहे. प्लॅटफॉर्मसह स्टेशनबाहेरील परिसरही प्रवाशांनी खचाखच भरला आहे. बिघाड दुरुस्त झाला असला तरी लोकल गाड्या वेळापत्रकानुसार धावत नाहीत. त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून, ती कधी सुरळीत होईल, हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे.
Published on: Oct 26, 2026 07:01 PM
CSMT वर रेल्वेचा खोळंबा! लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या गाड्याही 2 तास उशिर
राज्य सरकारने आनंदाचा शिधा योजना बंद केल्यानंतरही शिवसेनेकडून...
आता 100 टक्के इथेनॉलवर धावणार गाड्या! केंद्र सरकारचा मोठा निर्णय,
काँग्रेसचा दिल्लीत एल्गार! 1 नोव्हेंबरला ज्ञानेश कुमारांच्या विरोधात..

