AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रक्तरंजित खेळाने पाकिस्तान हादरला, अतिरेक्यांनी स्वतःलाच उडवलं, 12 सैनिकांसह 15 ठार

Pakistan Terror Attack : पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागात इस्लामी दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेले वाहन सुरक्षा चौकीवर धडकवून मोठा हल्ला केला. या हल्ल्यात 12 सैनिकांसह 15 जणांचा मृत्यू झाला.

रक्तरंजित खेळाने पाकिस्तान हादरला, अतिरेक्यांनी स्वतःलाच उडवलं, 12 सैनिकांसह 15 ठार
Pakistan Terror AttackImage Credit source: Google
| Updated on: Jul 24, 2026 | 11:08 PM
Share

दहशतवादी हल्ल्याने पाकिस्तान पुन्हा एकदा हादरला आहे. पाकिस्तानच्या लष्कराने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या उत्तर-पश्चिम भागात इस्लामी दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेले वाहन सुरक्षा चौकीवर धडकवून मोठा हल्ला केला. या हल्ल्यात 12 सैनिकांसह 15 जणांचा मृत्यू झाला. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, सुरक्षा दलांच्या प्रत्युत्तरात 12 दहशतवादी ठार झाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

12 सैनिकांसह 15 जण ठार

लष्कर आणि पोलिस संयुक्तपणे चालवत असलेल्या या सुरक्षा चौकीवर गुरुवार आणि शुक्रवारच्या मध्यरात्री अफगाणिस्तान सीमेवरील टँक जिल्ह्यात हल्ला करण्यात आला. हा भाग अनेक वर्षांपासून इस्लामी दहशतवाद्यांचा बालेकिल्ला मानला जातो. या हल्ल्यात 12 सैनिकांसह 15 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे लष्कराने तातडीने प्रत्युत्तर देत 12 दहशतवाद्यांचा खात्मा केला.

अलिकडच्या काही महिन्यांत पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागात दहशतवादी कारवायांमध्ये मोठी वाढ झाली आहे. लष्कराने जारी केलेल्या निवेदनानुसार, सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा जोरदार प्रतिकार केला. चौकीची सुरक्षा भेदण्यात अपयश आल्याने दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेले वाहन चौकीच्या बाहेरील भिंतीवर आदळवले, ज्यामुळे भीषण स्फोट झाला.

तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान संघटनेने स्वीकारली जबाबदारी

अफगाणिस्तान सीमेवरील या हल्ल्याची जबाबदारी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) या स्थानिक तालिबानी दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. संघटनेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात या हल्ल्यात चार आत्मघाती हल्लेखोर सहभागी असल्याचा दावा केला आहे. टीटीपी अनेक वर्षांपासून पाकिस्तान सरकारविरोधात सशस्त्र संघर्ष करत आहे. याचाच एक भाग म्हणून हा हल्ला करण्यात आला. TTP ही संघटना 2007 पासून पाकिस्तान सरकारविरोधात सक्रिय आहे. पाकिस्तान सरकारला सत्तेतून हटवून देशात इस्लामी कायदा लागू करणे हे या संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. मात्र यात आतापर्यंत या संघटनेला यश मिलालेले नाही.

पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर आरोप

पाकिस्तानकडून सातत्याने असा आरोप केला जात आहे की, दहशतवादी अफगाणिस्तानातील सुरक्षित ठिकाणांचा वापर प्रशिक्षण घेण्यासाठी आणि पाकिस्तानवरील हल्ल्यांचे नियोजन करण्यासाठी करतात. मात्र, अफगाणिस्तानने हे आरोप नेहमीच फेटाळले आहेत. अफगाणिस्तानचे म्हणणे आहे की, दहशतवाद ही पाकिस्तानची अंतर्गत समस्या आहे.

Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर