AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Priyanshu Moliya: 21 वर्षीय प्रियांशू मोलियासमोर अभिषेक काहीच नाही, 37 चेंडूत 150 धावा…अन् नंतर थेट त्रिशतक, आहे तरी कोण?

Who Is Priyanshu Moliya: रणजी ट्रॉफीच्या सामन्यात बरोडा आणि जम्मू काश्मीरचा सामना रंगला. या सामन्यात बरोड्याकडून खेळणाऱ्या प्रियांशुने तब्बल तीनशे धावा ठोकल्या म्हणजे त्रिशतक झळकावले. हा पराक्रम करणाला प्रियांशु मोलिया आहे तरी कोण?

Priyanshu Moliya: 21 वर्षीय प्रियांशू मोलियासमोर अभिषेक काहीच नाही, 37 चेंडूत 150 धावा...अन् नंतर थेट त्रिशतक, आहे तरी कोण?
| Updated on: Oct 28, 2026 | 11:05 AM
Share

Priyanshu Moliya Triple Century: बडोद्याचा अव्वल फळीतील फलंदाज, प्रियांशू मोलियाने अवघ्या २१ वर्षांच्या वयात, त्याने जम्मू आणि काश्मीरविरुद्ध केवळ शतकच नव्हे, द्विशतक नव्हे, तर त्रिशतक झळकावले आहे. वडोदरा येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रियांशू ३२१ धावांवर नाबाद राहिला. प्रियांशूच्या त्रिशतकासह महेश पिठियाच्या शानदार शतकामुळे वडोदऱ्याचा संघ ६१६ धावांवर सर्वबाद झाला. प्रियांशूचे शतक ऐतिहासिक आहे, कारण ७९ वर्षांत पहिल्यांदाच वडोदराच्या फलंदाजाने रणजी ट्रॉफीमध्ये त्रिशतक झळकावले आहे.

प्रियांशु मोलियाने वडोदरासाठी त्रिशतक झळकावण्याचा गुल मोहम्मद यांचा विक्रम मोडला आहे. गुल मोहम्मद यांनी १९४७ मध्ये होळकरांविरुद्ध ३१९ धावा केल्या होत्या. प्रियांशुने त्यांना मागे टाकले आहे. तसेच, १९४७ नंतर त्रिशतक झळकावणारा तो वडोदराचा पहिला फलंदाज आहे. यापूर्वी, २०१६ मध्ये दीपक हुडाने २९३ धावा केल्या होत्या.

प्रियांशु मोलियाचा जन्म १७ जून, २०२५ रोजी राजकोट येथे झाला. हा खेळाडू भारतीय १९ वर्षांखालील संघाचा सदस्यही राहिला आहे. २०२४ मध्ये तो १९ वर्षांखालील विश्वचषक संघाचा भाग होता. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी त्याने रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले आणि सलग दोन शतके झळकावली; नारी कॉन्ट्रॅक्टरनंतर असा पराक्रम करणारा तो पहिला फलंदाज ठरला. अलीकडेच, त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये दोन शतकांसह ३७९ धावा केल्या.प्रियांशुला क्रिकेटपटू बनवण्यासाठी त्याचे वडील, सुरेश मोलिया यांनी मोठे त्याग केले. ते हिऱ्याचे व्यापारी आहेत, पण मुलाला आधार देण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली. त्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण लक्ष प्रियांशुच्या सरावावर आणि सामन्यांच्या प्रवासावर केंद्रित केले. आपल्या मुलाला क्रिकेटपटू बनवण्यासाठी ते राजकोटहून वडोदराला स्थायिक झाले. जिथे प्रियांशूने मोहिंदर लाला अमरनाथ क्रिकेट अकादमीमध्ये पहिल्या वर्षी १,१०० धावा आणि दुसऱ्या वर्षी १,५०० धावा केल्या. त्याने एका सामन्यात ५५६ धावादेखील केल्या होत्या. आता तो रणजी ट्रॉफीमध्ये आपले कौशल्य दाखवत आहे.

Follow Us
पुणे, अमरावती, नाशिकमध्ये १०-१० हजार रुपये वाटले; संजय राऊतांचा दावा
Sanjay Raut : पुणे, अमरावती, नाशिकमध्ये १०-१० हजार रुपये वाटले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात चुरस वाढली; प्रतापसिंह पाटील आघाडीवर तर....
Marathwada MLC Election Results 2026 : मराठवाडा पदवीधर मतदारसंघात चुरस वाढली; प्रतापसिंह पाटील आघाडीवर, सतीश चव्हाण पिछाडीवर
प्रदीप पूर्णेकर प्रकरण तापलं, घोडबंदर रोडवर रास्ता रोको....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरण तापलं, घोडबंदर रोडवर रास्ता रोको; मीनाक्षी शिंदे, राजेंद्र शिंदेंच्या अटकेची मागणी
सकाळी वृक्षतोडस्थळाची पाहणी तर सायंकाळी राज ठाकरेंची जाहीर सभा
Bhimashankar Torrent Project : Raj Thackeray : सकाळी वृक्षतोडस्थळाची पाहणी तर, सायंकाळी राज ठाकरेंची जाहीर सभा
मतपेटीत चिठ्ठ्या टाकून मतदारांचा संताप; असला आमदार नको गं बाई म्हणत...
Marathwada MLC Election Result : मतपेटीत चिठ्ठ्या टाकून मतदारांचा संताप; असला आमदार नको गं बाई म्हणत नाराजी व्यक्त
शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा युक्तिवाद
Shivsena : शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा युक्तिवाद; महाराष्ट्राचं लक्ष
पुणे पदवीधरसाठी दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु....
Maharashtra MLC Result 2026 : पुणे पदवीधरसाठी दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु
20 हजारांहून अधिक मतं अपक्षाच्या खात्यात; रविराज साबळेंमुळे मराठवाडा..
Marathwada MLC Election Results 2026 : 20 हजारांहून अधिक मतं अपक्षाच्या खात्यात; रविराज साबळेंमुळे मराठवाडा पदवीधरचा निकाल बदलणार?
पदवीधर मतदारसंघात महायुती की मविआ कोण मारणार बाजी?
Maharashtra MLC Election Final Results 2026 : पदवीधर मतदारसंघात महायुती की मविआ कोण मारणार बाजी? निकालाकडे सर्वांचं लक्ष
कोटा पूर्ण करण्यासाठी हर्षदा देशमुख यांना किती मतांची गरज....
Harshada Deshmukh : Maharashtra MLC Election Final Results 2026 : कोटा पूर्ण करण्यासाठी हर्षदा देशमुख यांना किती  मतांची गरज; पुणे पदवीधर निवडणुकीत काय घडणार?