पाकिस्तान
14 ऑगस्ट 1947 रोजी झालेल्या फाळणीनंतर पाकिस्तान एक स्वतंत्र देश बनला. मोहम्मद अली जिन्ना यांना पाकिस्तानचे जनक मानले जाते. जिन्ना पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल बनले आणि लियाकत अली खान यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आहे. पाकिस्तानमधील प्रमुख शहरांमध्ये लाहोर आणि कराचीचा समावेश होतो. ही शहरे ऐतिहासिक दृष्टिकोनातून जगभर प्रसिद्ध आहेत. पाकिस्तान हा जगातील 33वा सर्वात मोठा देश आहे आणि दक्षिण आशियामधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. पाकिस्तानचं क्षेत्रफळ 881,913 चौरस किलोमीटर आहे. 2023 सालाच्या आकडेवारीनुसार पाकिस्तानची लोकसंख्या 241.5 दशलक्ष आहे. पाकिस्तान जगातील सर्वात मोठ्या मुस्लिम लोकसंख्येचा देश मानला जातो. 2017 च्या जनगणनेनुसार पाकिस्तानची लोकसंख्या 20.7 कोटी होती. पाकिस्तानात 48 टक्के पंजाबी आहेत आणि दुसऱ्या क्रमांकावर सुमारे 16 टक्के पठाण आहेत. पंजाबी लोकसंख्या मोठी असतानाही पाकिस्तानात पंजाबी भाषेला संवैधानिक दर्जा मिळालेला नाही. पाकिस्तान धर्माच्या आधारावर भारतापासून विभक्त झाला होता, पण बंगाली भाषा आणि अस्मितेच्या चळवळीमुळे 1971 साली पाकिस्तानपासून विभाजित होऊन बांगलादेशची निर्मिती झाली. पाकिस्तानची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर आधारित आहे. येथील प्रमुख धर्म इस्लाम आहे. पाकिस्तानची 96 टक्के जनता मुस्लिम आहे, तर 1.6 टक्के हिंदू आहेत. पाकिस्तानमध्ये चार प्रमुख प्रांत आहेत - पंजाब, सिंध, बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा. पाकिस्तानने अनेक वेळा मार्शल लॉ, महागाई, खालावलेली अर्थव्यवस्था, दहशतवाद आणि राजकीय अस्थिरता यांचा सामना केला आहे. अमेरिका व्यतिरिक्त चीन हा पाकिस्तानचा सर्वात मोठा सहायक देश मानला जातो.
India-Pakistan War : पुढच्यावर्षी 2026 मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध होईल का? अमेरिकेचा मोठा दावा
India-Pakistan War : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांना टार्गेट केलं. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला. भारताने या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं.
- Dinananth Parab
- Updated on: Dec 31, 2025
- 1:08 pm
Pakistan: पहलगाम सारखा कट, पुन्हा हिंदू टार्गेटवर, पाकिस्तानची मोठी कुरापत समोर
Pakistan ISI: पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ISI ने दहशतवादी पाठवून पहलगाम हल्ला घडवल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता नवीन वर्षात पुन्हा एकदा जम्मू आणि काश्मीरमध्ये घातपात करण्याचा कट पाकिस्तानने रचला आहे. यासंबंधीची मोठी माहिती समोर आली आहे. काय आहे ती अपडेट?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 30, 2025
- 3:06 pm
भारताने पाकिस्तानला किती रुपये कर्ज दिलं, नेमकं कशावर जगतो? सत्य काय?
पाकिस्तानमध्ये गरिबीचे प्रमाण फार जास्त आहे. पाकिस्तान आपला विकास व्हावा यासाठी कर्ज घेतो. भारताने पाकिस्तानला कर्ज दिलेले आहे का? हे जाणून घेऊ या...
- Prajwal Dhage
- Updated on: Dec 29, 2025
- 9:13 pm
पाकिस्तान, चीनची झोप उडाली, भारत खरेदी करणार तब्बल 79 हजार कोटींचे शस्त्र; भविष्यात काय होणार?
भारत सरकारने तब्बल 79 हजार कोटी रुपयांच्या शस्त्र खरेदीला परवानगी दिलेली आहे. त्यामुळे आता भारताचे वायू दल, नौसेना तसेच भूदलाला मोठे बळ मिळणार आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Dec 29, 2025
- 4:29 pm
मुनीर विरोधात बोलण भोवलं, माजी पाकिस्तानी आर्मी ऑफिसरवर कठोर कारवाई, थेट…
Adil Raja : लष्करप्रमुख असीम मुनीर विरोधात बोलल्यामुळे एका अधिकाऱ्याला मोठा फटका बसला आहे. पाकिस्तान सरकारने निवृत्त मेजर आदिल रझा यांना अनुसूची 4 चे दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Dec 28, 2025
- 6:47 pm
Operation Sindoor: ‘जीव वाचवण्यासाठी बंकरमध्ये लपावे लागले’, पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारींचा सर्वात मोठा कबुलीनामा
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानात नेत्यांची भीतीने गाळण उडाली होती, या काळात भारत मोठा निर्णय घेण्याची भीती त्यांना सतावत होती. याविषयीचे एक मोठे वक्तव्य पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी केले आहे. त्यांनी याविषयीचा जाहीर कबुलीनामा दिला आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 28, 2025
- 9:40 am
सौदी अरेबियानंतर भारताचा आणखी एक जवळचा मित्र पाकिस्तानसोबत करणार मोठा करार
हा दौरा अनेक अर्थांना ऐतिहासिक आहे. पहिल्यांदा यूएईचे राष्ट्रपती पाकिस्तानचा अधिकृत राजकीय दौरा करणार आहेत. पाकिस्तान सरकार याकडे मोठी संधी म्हणून पाहत आहे. खासकरुन आता पाकिस्तानी अर्थव्यवस्था दबावाखाली आहे.
- Dinananth Parab
- Updated on: Dec 26, 2025
- 3:35 pm
Operation Sindoor : मग, भारताचं काय चुकलं? पाकिस्तानच्या ल्यारीमधून आला ऑपरेशन सिंदूरचं समर्थन करणारा पहिला आवाज
Operation Sindoor : असीम मुनीरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी सैन्याची त्यांनी निंदा केली. जमीयत उलेमा-ए-इस्लाम-F (JUI-F) चे चीफ मौलाना फजलुर रहमान यांनी इस्लामाबादच्या लॉजिकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
- Dinananth Parab
- Updated on: Dec 25, 2025
- 4:44 pm
पाकिस्तान भिकेला लागला, सरकारी विमान वाहतूक कंपनी विकली; खरेदी करणाऱ्याचे भारताशी खास कनेक्शन!
पाकिस्तानने आपली सरकारी विमान वाहतूक कंपनी विकली आहे. ही कंपनी खरेदी करणाऱ्या उद्योजकाचे भारतासी खास नाते आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Dec 24, 2025
- 9:14 pm
GK : पाकिस्तानच्या सैन्यात किती महिला आहेत? आकडा वाचून बसेल धक्का
Women in Pakistan Army : पाकिस्तानमध्ये महिलांना दुय्यम स्थान आहे, सार्वजनिक ठिकाणीही महिलांची उपस्थिती मर्यादित असते. आज आपण पाकिस्तानच्या सैन्यात किती महिला आहेत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
- बापू गायकवाड
- Updated on: Dec 24, 2025
- 9:03 pm
इम्रान खानच्या पत्नीचे हाल, जेलमध्ये उंदरांसोबत राहण्याची वेळ; जेवणात मिर्जी पावडर… UN चा धक्कादायक अहवाल
Bushra Bibi : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांती पत्नी बुशरा बीबी खान यांनी तुरुंगात मिळणाऱ्या सुविधांबाबत संयुक्त राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांना उंदरांसोबत रहावे लागत असल्याचे समोर आले आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Dec 24, 2025
- 7:54 pm
मैत्रीचं नाटक करणाऱ्या चीनची पुन्हा गद्दारी, भारताला सर्वात मोठा झटका, थेट शत्रू राष्ट्रासोबत…
अमेरिकेकडून लावण्यात आलेल्या टॅरिफनंतर भारत आणि चीनची जवळीक वाढत असल्याचं पहायला मिळत आहे, मात्र याचदरम्यान एक रिपोर्ट समोर आला असून, या रिपोर्टमुळे खळबळ उडाली आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Dec 24, 2025
- 5:11 pm