AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! पाकिस्तान हादरलं, भारताच्या सर्वात मोठ्या शत्रूची पाकमध्ये हत्या, समोरून आले अन् धड धड गोळ्या झाडल्या..

पाकिस्तानातून मोठी बातमी समोर येत आहे, पाकिस्तान हादरलं आहे. पाकिस्तानमध्ये मोस्ट वॉटेंड दहशतवाद्याची हत्या करण्यात आली आहे. अज्ञाताकडून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे.

मोठी बातमी! पाकिस्तान हादरलं, भारताच्या सर्वात मोठ्या शत्रूची पाकमध्ये हत्या, समोरून आले अन् धड धड गोळ्या झाडल्या..
पाकिस्तानमध्ये मोस्ट वॉटेंड दहशतवाद्याची हत्या Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 15, 2026 | 6:33 PM
Share

पाकिस्तानातून मोठी बातमी समोर येत आहे. भारताचा मोस्ट वॉटेंड दहशतवादी मोहम्मद कासिम गुज्जर याची अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळी मारून हत्या केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार जेव्हा मोहम्मद गुज्जर याची हत्या करण्यात आली तेव्हा तो आपल्या बाईकवर बसून कुठेतरी जात होता, याचवेळी त्याच्यावर गोळीबार करण्यात आला, या घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे. कासिम गुज्जर हा मुळ जम्मू काश्मीरच्या रियासी जिल्ह्याचा रहिवासी होता, तो लष्कर-ए तैयबा या संघटनेचा दहशतवादी होता. तो गेल्या अनेक दिवसांपासून पाक व्याप्त काश्मीरमध्ये लपून बसला होता, मात्र आज त्याची पेशावरमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. या वृत्ताला अद्यापपर्यंत कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही, मात्र त्याच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

कोण आहे मोहम्मद कासिम गुज्जर?

भारत सरकारकडून मार्च 2024 मध्ये अनेक दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाइंड असलेल्या मोहम्मद कासिम गुज्जर उर्फ सलमान उर्फ सुलेमान याला यूएपीए अंतर्गत दहशतवादी घोषित करण्यात आलं होतं. या संदर्भात भारताच्या गृह मंत्रालयानं ट्विट करत माहिती दिली होती. लष्कर ए तैबासाठी काम करणारा मोहम्मद कासिम गुज्जर हा अनेक दहशतवादी हल्ल्यांसाठी जबाबदार आहे, या दहशतवादी हल्ल्यांमध्ये अनेकांनी आपला जीव गमावला आहे, भारताविरोधात कट कारस्थानामध्ये त्याचा सहभाग आहे. भारताच्या अखंडतेला आणि एकतेला जर कोणी धोका निर्माण करत असेल तर त्याला सोडणार नाही, असं ट्विट करण्यात आलं होतं.

अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग

पीआयबीच्या एका रिपोर्टनुसार मोहम्मद कासिम गुज्जर हा जम्मू काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातल्या अंगराल्ला गावचा रहिवासी होता. त्याचा अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग आहे. तो पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर ए तैबासाठी काम करत होता. भारतामध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी प्रयत्न, दहशतवादी हल्ल्यांची योजना बनवणे तसेच शस्त्रांची तस्करी असे त्यावर भारतामध्ये आरोप होते, अखेर त्याची हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे, त्याच्यावर अज्ञाताने गोळ्या झाडल्या आहेत.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात