AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune : बाळासाहेबांचा अवमान सहन करणार नाही...; शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन

Pune : बाळासाहेबांचा अवमान सहन करणार नाही…; शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन

| Updated on: Nov 19, 2026 | 5:55 PM
Share

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने शिंदे शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एन.सी. यांच्याविरोधात पुण्याच्या चाकणमध्ये तीव्र आंदोलन केले. बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र फाडल्याच्या आरोपावरून संतप्त शिवसैनिकांनी शायना एन.सी. यांच्या प्रतिमेला जोडे मारत घोषणाबाजी केली. या वाचाळवीरांना पदमुक्त करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली.

पुण्याच्या चाकण येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी शिंदे शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एन.सी. यांच्याविरोधात तीव्र आंदोलन केले. शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र फाडल्याचा गंभीर आरोप शायना एन.सी. यांच्यावर करण्यात आला आहे. या आरोपाच्या निषेधार्थ असंख्य शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते.

आंदोलकांनी शायना एन.सी. यांच्या प्रतिमेला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी केली. “बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान आम्ही सहन करणार नाही,” असा आक्रमक इशारा आंदोलक शिवसैनिकांनी दिला. काल झालेल्या घटनेनंतर २४ तास उलटूनही शिंदे सरकारने शायना एन.सी. यांच्यावर कोणतीही कारवाई न केल्याने शिवसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अशा वाचाळवीरांना तत्काळ पदावरून दूर करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली.

 

 

Published on: Nov 19, 2026 05:55 PM

Follow Us