AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या पाच लोकांना कधीच उपदेश देण्याच्या भानगडीत पडू नका, चाणक्य काय म्हणतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात या समाजात असे काही लोक आहेत, त्यांना कधीही सल्ला देण्याची चूक करू नये. कारण यामुळे तुमचंच नुकसान होऊ शकतं.

Chanakya Niti : या पाच लोकांना कधीच उपदेश देण्याच्या भानगडीत पडू नका, चाणक्य काय म्हणतात?
Chanakya Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 19, 2026 | 7:13 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील काळाच्या सुसंगत वाटतात. चाणक्य म्हणतात आयुष्य जगत असताना आपल्या आयुष्यात लाखो प्रकारचे लोक येतात. यातील काही लोक असे असतात, ज्यांना तुम्ही उपदेश देणं किंवा कोणत्याही गोष्टींचा सल्ला देणं टाळलं पाहिजे. कारण तुम्ही जर अशा लोकांना सल्ला देण्याच्या भानगडीमध्ये पडलात तर ते प्रकरण तुमच्या अंगलट येऊ शकतं, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

मूर्ख लोकं – चाणक्य म्हणतात जे लोकं मूर्ख आहेत, अशा लोकांना कधीही सल्ला देण्याच्या भानगडीमध्ये पडू नये, कारण यामुळे तुमचंच नुकसान होण्याची शक्यता असते. मूर्ख लोकं नेहमी तुमच्या सल्ल्याचा चुकीचा अर्थ लावतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

तुमच्याबद्दल चुकीचा विचार करणारे लोकं – चाणक्य म्हणतात जे लोकं नेहमी तुमच्याबद्दल चुकीचाच विचार करतात, काहीही झालं तरी ते तुमच्याबद्दल त्यांच्या मनात अकसाची भावना ठेवतात, अशा लोकांना चुकूनही उपदेश करण्याच्या भानगडीमध्ये पडू नये.

राजा – चाणक्य म्हणतात राजा हा असा व्यक्ती असतो, ज्याला कधीच कोणी उपदेश केलेला आवडत नाही. जर तुम्ही राजाला उपदेश द्यायला जाल तर त्याचा उलटा परिणाम होऊ शकतो, तो तुमच्यावर नाराज होईल, त्यामुळे राजाला कधीही उपदेश करून नका.

स्वत:च्या मनाचचं ऐकणारे लोकं – चाणक्य म्हणतात या समाजात असे काही लोक असतात, जे समाजाचं ऐकतात परंतु नेहमी स्वत:च्या मनाचच करतात. अशा लोकांना देखील कधीही सल्ला किंवा उपदेश देता कामा नये. यामुळे तुम्हाला मनस्ताप सहन करावा लागेल, असं चाणक्य म्हणतात.

स्वार्थी लोक – चाणक्य म्हणतात कधीही स्वार्थी लोकांना देखील उपदेश करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. त्याचा काहीही फायदा होणार नाही.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्ष..
Shivsena : BJP : शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्षबदलाने पालघरच्या राजकारणात खळबळ
शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना....
Eknath Shinde : हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; पंढरपुरातून रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना
शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन...
Pune : बाळासाहेबांचा अवमान सहन करणार नाही...; शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन
शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
Shivsena Supreme Court Hearing : शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ
GTA 6 Launch : तब्बल 13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ
एकनाथ शिंदे निर्णय घेतील; शायना एनसी यांच्याबबात आणखी काय म्हणाल्या...
एकनाथ शिंदे निर्णय घेतील; शायना एनसी यांच्याबबात आणखी काय म्हणाल्या रितू तावडे?
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणीदरम्यान... अपात्रता प्रकरणात मला रिजॉइंडर...
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणीदरम्यान... अपात्रता प्रकरणात मला रिजॉइंडर करायचा आहे, सिब्बल नेमके काय म्हणाले?
मोठी बातमी! पंढरपुरात शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; नेमकं काय घडलं
Eknath Shinde : मोठी बातमी! पंढरपुरात शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; नेमकं काय घडलं?
गुवाहाटीमध्ये बसून व्हीप कोण असेल हे शिंदे ठरवू शकत नाहीत; कपिल सिब्बल
Shivsena Hearing : गुवाहाटीमध्ये बसून व्हीप कोण असेल हे शिंदे ठरवू शकत नाहीत; कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
पहिल्यांदा चाकू लागला तेव्हा वाचलास, आता गोळी लागली तर…; सैफ अली खानला
Saif Ali Khan Threat : पहिल्यांदा चाकू लागला तेव्हा वाचलास, आता गोळी लागली तर…; सैफ अली खानला धमकीचा मेसेज