AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saif Ali Khan Threat : पहिल्यांदा चाकू लागला तेव्हा वाचलास, आता गोळी लागली तर…; सैफ अली खानला धमकीचा मेसेज

Saif Ali Khan Threat : पहिल्यांदा चाकू लागला तेव्हा वाचलास, आता गोळी लागली तर…; सैफ अली खानला धमकीचा मेसेज

| Updated on: Nov 19, 2026 | 4:21 PM
Share

अभिनेता सैफ अली खानला धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील फरार आरोपी झिशान अख्तरच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे. करीना कपूरने केलेल्या चुकीची शिक्षा सैफला भोगावी लागेल, असे धमकीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला धमकी मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील फरार आरोपी झिशान अख्तरच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या धमकीमध्ये सैफ अली खानची पत्नी, अभिनेत्री करीना कपूरच्या कथित चुकीचा उल्लेख करण्यात आला आहे.

धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वतःला रोहित गुजरा गँगस्टर झिशान अख्तर असे म्हटले आहे. “सैफ अली खान, बघ, तुझ्या पत्नीने (करीना कपूरने) जी चूक केली आहे, त्याची शिक्षा तुला भोगावी लागू नये. पहिल्यांदा चाकू लागला होता, तेव्हा तू वाचलास, वरच्या देवाने वाचवले. पण, जेव्हा आमची गोळी लागेल, तेव्हा बाबा सिद्दीकीसारखी अवस्था होऊ नये,” असे या धमकीत स्पष्टपणे म्हटले आहे.

या गंभीर प्रकरणाची मुंबई पोलिसांनी तात्काळ दखल घेतली आहे. ही धमकी झिशान अख्तरनेच दिली आहे की त्याच्या नावाने दुसऱ्या कोणी ही धाकधुकी केली आहे, याबाबत पोलीस कसून तपास करत आहेत. या धमकीमुळे बॉलिवूड वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून पुढील माहिती मिळण्याची शक्यता आहे.

Published on: Nov 19, 2026 04:21 PM

Follow Us