Congress : पत्रकाराच्या अंगावर धावले काँग्रेस नेते ऋषिकेश लाड; सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी दमदाटीचा व्हिडिओ व्हायरल
सांगली जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि काँग्रेस नेते ऋषिकेश लाड यांनी एका पत्रकारासोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीदरम्यान ऋषिकेश लाड पत्रकाराच्या अंगावर धावून जात दमदाटी करताना दिसले. एका व्यक्तीने हा संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये कैद केला.
सांगली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते ऋषिकेश लाड यांच्या अरेरावीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेदरम्यान हा प्रसंग घडला. ऋषिकेश लाड एका पत्रकाराच्या अंगावर धावून गेले आणि त्यांनी त्याला धमकावल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे. एका अज्ञात व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेरात हा संपूर्ण प्रकार कैद केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निवडणुकीच्या घडामोडींचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराला लाड यांनी कोणता पत्रकार आहेस तू? कुठला पत्रकार आहेस तू? चला रे. चला चला. जाऊदे चला असूदे असे म्हणत दमदाटी केली. लाड यांचे हे वर्तन काँग्रेस पक्षाच्या नेत्याला शोभणारे नसून, लोकप्रतिनिधीने अशा प्रकारे पत्रकारांशी गैरवर्तन करणे चुकीचे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. हा संपूर्ण प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या घटनेवर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.
Published on: Nov 19, 2026 02:04 PM
पत्रकाराच्या अंगावर धावले काँग्रेस नेते ऋषिकेश लाड; दमदाटीचा व्हिडिओ..
बुलेटवर स्वार होत एकनाथ शिंदेंची पंढरपुरात पाहणी; कार्तिकी यात्रा...
न्यायालयाचा आदेश तरीही 324 बकऱ्यांची विक्री? बाळूमामा देवस्थान पुन्हा
शिंदे सेनेला पालघरमध्ये मोठा धक्का! माजी आमदार श्रीनिवास वनगांचा BJP..

