AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dadar : दादर रेल्वे स्थानकाला मिळणार नवी ओळख? चैत्यभूमी नामकरणाच्या हालचालींना वेग!

Dadar : दादर रेल्वे स्थानकाला मिळणार नवी ओळख? चैत्यभूमी नामकरणाच्या हालचालींना वेग!

| Updated on: Nov 19, 2026 | 1:07 PM
Share

दादर रेल्वे स्थानकाचे नाव लवकरच चैत्यभूमी होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळात या संदर्भात आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याची घोषणा केली आहे. अनेक वर्षांपासूनची ही मागणी असून, या नामकरणासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारला पत्रही पाठवले होते. मात्र, मनसेने या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे.

मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाला लवकरच चैत्यभूमी असे नाव दिले जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अधिवेशनात या नामकरणासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याची घोषणा केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथील तयारीचा आढावा घेताना फडणवीस यांनी हे सूतोवाच केले. गेल्या अनेक वर्षांपासून दादर स्थानकाचे नाव चैत्यभूमी करण्याची मागणी होत होती. राज्य सरकारने यापूर्वीच या मागणीला तत्वतः मान्यता देऊन केंद्र सरकारला पत्र पाठवले होते.

केंद्राकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शनानुसार, आता विधिमंडळात ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतरच स्थानकाचे अधिकृत नामकरण करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दादर रेल्वे स्थानकाच्या या प्रस्तावित नामकरणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) विरोध दर्शवला आहे. मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी म्हटले आहे की, दादरच्या स्थानिकांचे मत विचारात न घेता बाहेरच्यांच्या मागणीला त्यांच्यावर लादले जात आहे, ज्यामुळे दादरकरांची ओळख पुसली जात आहे. या घटनेचा मनसेने तीव्र निषेध केला आहे.

Published on: Nov 19, 2026 01:07 PM

Follow Us