अजितदादांच्या निधानानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांना भविष्याची चिंता?
अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या गटातील राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये भविष्याबद्दल चिंता वाढली आहे. 30-32 आमदार शरद पवार गटाच्या नेत्यांशी संपर्कात असल्याची माहिती आहे, ज्यात काहींनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली. त्याचदरम्यान, अजित पवारांच्या निधनाच्या दिवशी शासकीय दुखवटा असताना अल्पसंख्याक विभागाने 75 शैक्षणिक संस्थांना परस्पर प्रमाणपत्र वाटल्याचा गंभीर आरोप अक्षय जैन यांनी केला आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) आमदारांना आपल्या राजकीय भविष्याची चिंता सतावत आहे. सूत्रांनुसार, अजित पवार गटातील जवळपास 30 ते 32 आमदार सध्या शरद पवार गटाच्या नेत्यांशी संपर्क साधत आहेत. यातील काही आमदारांनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली असून, काहींनी फोनवरून संपर्क साधला आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे त्यांच्या गटात तुल्यबळ नेतृत्वाची पोकळी निर्माण झाल्याची भीती आमदारांमध्ये आहे, ज्यामुळे ते पुन्हा शरद पवार गटाकडे जाण्याचा विचार करत आहेत. निधीवाटप आणि प्रशासकीय कामांमध्ये येणाऱ्या अडचणींमुळे आमदार दोन राष्ट्रवादी गटांच्या विलीनीकरणाची मागणी करत असल्याचेही म्हटले जात आहे.
दरम्यान, अजित पवारांच्या निधनाच्या दिवशीच एक गंभीर आरोप समोर आला आहे. प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी मंत्रालयात शासकीय दुखवटा असतानाही अल्पसंख्याक विभागाच्या अधिकाऱ्यांनी 75 शैक्षणिक संस्थांना अनधिकृतपणे प्रमाणपत्र वाटल्याचा दावा केला आहे. या प्रमाणपत्रांना यापूर्वी माणिकराव कोकाटे यांनी स्थगिती दिली होती, असेही जैन यांनी सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट...
मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात
