AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय

NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय

| Updated on: Jul 24, 2026 | 3:26 PM
Share

NEET पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर आता कठोर कारवाईचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून पेपरफुटी रोखण्यासाठी आणण्यात येणाऱ्या सुधारणा विधेयकात दोषींना कठोर शिक्षा आणि मोठ्या दंडाची तरतूद करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, पेपरफुटी प्रकरणातील दोषींना 10 वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय दोषींवर 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्याची तरतूदही विधेयकात करण्यात आली असल्याचे समोर आले आहे.

यासोबतच अशा प्रकरणांचा तातडीने निकाल लागावा यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात अवघ्या तीन महिन्यांच्या आत सुनावणी पूर्ण करण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता वाढवणे आणि पेपरफुटीसारख्या गंभीर गुन्ह्यांना आळा घालणे हा या सुधारणा विधेयकाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या तरतुदींवर सरकारकडून अधिकृत घोषणा होणे अद्याप बाकी आहे.

Published on: Jul 24, 2026 03:26 PM

Follow Us