CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनात मोठी घडामोड समोर आली आहे. केंद्र सरकार आणि CJP (कॉक्रोच जनता पार्टी) यांच्यात झालेल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर आंदोलनकर्त्यांच्या तीन प्रमुख मागण्यांपैकी दोन मागण्या सरकारने मान्य केल्याची माहिती CJPच्या प्रतिनिधींनी दिली आहे. मात्र, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर अद्याप निर्णय झालेला नाही.

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना CJPचे प्रतिनिधी सौरभ दास यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. तसेच आंदोलनादरम्यान बाधित विद्यार्थ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणीही सरकारने मान्य केली असल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर कोणतीही तडजोड होणार नसल्याची भूमिका CJPने कायम ठेवली आहे. याबाबत सरकारने उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत वेळ मागितला असून, त्यानंतर पुन्हा एकदा सरकार आणि CJP यांच्यात बैठक होणार असल्याची माहिती सौरभ दास यांनी दिली.
दरम्यान, CJPचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनीही सरकारकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत निर्णयासाठी वेळ मागण्यात आल्याची पुष्टी केली. सरकार या मागणीवर सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सध्या सरकारने विद्यार्थ्यांवरील 11 एफआयआर आणि कायदेशीर कारवाई मागे घेण्यास तसेच नुकसानभरपाईच्या मागणीस तत्त्वतः मंजुरी दिली आहे. मात्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित असून, आता उद्या दुपारी होणाऱ्या पुढील बैठकीकडे देशभराचे लक्ष लागले आहे.
Published on: Jul 24, 2026 03:49 PM
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर