AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हवामानात मोठे बदल, भारतीय हवामान विभागाचा थेट येलो अलर्ट, उष्णतेसह…

हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. मागील काही दिवसांपासून राज्यात उन्हाचे चटके अधिक जाणवताना दिसत आहेत. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा अंदाज वर्तवला आहे.

हवामानात मोठे बदल, भारतीय हवामान विभागाचा थेट येलो अलर्ट, उष्णतेसह...
heat wave warning
| Updated on: Mar 05, 2026 | 7:23 AM
Share

राज्यासह देशातील हवामानात मागील काही दिवसांपासून सतत मोठे बदल होत आहेत. थंडी, उष्णता आणि पाऊस अशी स्थिती सध्या आहे. मागच्या आठवड्यात राज्यातील काही भागात मोठा पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना सळो की पळो झाले. रब्बीचे हाताशी आलेले पिक शेतकऱ्यांच्या हातून गेले. राज्यातील जवळपास भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अजूनही काही राज्यात पाऊस सुरू असल्याची स्थिती आहे. नोव्हेंबर महिन्यात ऐन दिवाळीच्या वेळी पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता. 1 जानेवारीपर्यंत राज्यात थंडी होती. मात्र, त्यानंतर पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली, ज्यानंतर थंडी गायब झाली. फेब्रुवारी महिन्यात उष्णता, पाऊस आणि थंडी असे तिन्ही हंगाम बघायला मिळाले. मार्च महिन्याच्या सुरूवातीपासूनच राज्यात उष्णता आणि दमट वातावरण बघायला मिळतंय.

कालच भारतीय हवामान विभागाने उष्णता आणि दमट वातावरणाकरिता येलो अलर्ट जारी केला होता. आजही भारतीय हवामान विभागाने कोकणात दमट आणि उष्ण हवामानाचा येलो अलर्ट जारी करून सतर्कतेचा इशारा दिला आहे. राजस्थानच्या सिकार येथे देशातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. सिकार येथे 12.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

अकोला येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. अकोला येथे 38.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. धुळ्यात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. धुळ्यात 13.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, तापमान चढउतार बघायला मिळेल. कोकणात येलो अलर्ट जारी करण्यात आला. आज दिवसभर उष्णता राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला.

पुणे शहर आणि परिसरात तापमान सरासरीपेक्षा दोन अंश सेल्सियस जास्त असून कोरेगाव पार्क येथे सर्वाधिक 37 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शहर आणि परिसरात तापमान वाढ झाली आहे. सलग दोन दिवस शिवाजीनगर येथे 35 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ होताना दिसत आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाचे चटके बसत आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...