AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझ्या खोलीत आली, संमतीशिवायच तिने केलं किस.. प्रशिक्षणार्थी IPS अधिकाऱ्याचा जीवन संपवण्याचा प्रयत्न; 2पानी चिठ्ठीत..

हैदराबादमधील राष्ट्रीय पोलीस अकादमीतील आयपीएस प्रशिक्षणार्थी उदय कृष्ण रेड्डीने सहकारी महिला अधिकाऱ्याच्या छळाच्या आरोपांनंतर आत्महत्येचा प्रयत्न केला. रेड्डीने प्रेमसंबंधांचा दावा करत महिलेचे आरोप फेटाळले. तिने लग्नानंतरही जवळीक ठेवण्याचा आग्रह धरल्याचे चिठ्ठीत म्हटले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

माझ्या खोलीत आली, संमतीशिवायच तिने केलं किस.. प्रशिक्षणार्थी IPS अधिकाऱ्याचा जीवन संपवण्याचा प्रयत्न; 2पानी चिठ्ठीत..
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Jul 22, 2026 | 8:23 AM
Share

हैदराबादमधील एक प्रकरण सध्या बरंच गाजत आहे. तेथील ‘नॅशनल पोलीस अकादमी’मधील एका आयपीएस (IPS) प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्येचा प्रयत्न केल्याने सगळेच हादरले. उदय कृष्ण रेड्डी असं त्याचं नाव असून त्याला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. एका सहकारी प्रशिक्षणार्थी महिला अधिकाऱ्याने त्याच्यावर छळाचे आरोप केले होते, त्यानंतर या अधिकाऱ्याने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. ज्या सहकारी आयपीएस प्रशिक्षणार्थीने आपल्यावर आरोप केले, तिच्याशी माझे प्रेमसंबंध होते, पण तिचं लग्न झाल्यावरही जवळीक कायम रहावी असा तिचा आग्रह होता, असा दावा उदय कृष्ण रेड्डी याने त्या चिठ्ठीत केला आहे. यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे. सध्या रेड्डी याला रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकादमीच्या अधिकाऱ्यांनीही रुग्णालयाला भेट दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी रेड्डी हा शहरातील त्याच्या एका मित्राच्या घरी गेला, त्यानंतरच त्याने विष प्राशन केलं. मात्र, हा आत्महत्येचा प्रयत्न होता की नाही, याला अधिकाऱ्यांनी अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही. आयपीएस प्रोबेशनर असलेल्या एका 30 वर्षीय महिला अधिकाऱ्याने रेड्डी याच्यावर अनेक आरोप लावले होते. पाठलाग करणे, मारहाण, गुन्हेगारी स्वरूपाची धमकी देणे आणि संमतीशिवाय खाजगी व्हिडिओ चोरून रेकॉर्ड करणे असे आरोप करत त्या महिलेने रेड्डीविरोधात तक्रार दाखल केली होती, त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच ही घटना घडल्याचे समजते.

महिलेने केले आरोप

त्यानंतर संबंधित महिलेच्या तक्रारीवरून, हैदराबाद पोलिसांनी ‘भारतीय न्याय संहिता’ (BNS) च्या विविध कलमांसह ‘माहिती तंत्रज्ञान कायद्या’च्या (Information Technology Act) संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.  ‘ रेड्डीने मला तिला व्हॉट्सॲपवर लैंगिकदृष्ट्या आक्षेपार्ह मेसेज पाठवले, तसेच इतर प्रशिक्षणार्थींसमोर आपल्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली. तसेच, माझे दुसऱ्या प्रशिक्षणार्थीशी संबंध आहेत, असा आरोप वारंवार केला,  ते कबूल करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला,  असभ्य भाषेत वर्तन केलं” असे अनेक आरोप त्या महिलेने तिच्या तक्रारीत केले. एवढंच नव्हे तर रेड्डीने बळजबरीने माझा मोबाईल फोन घेऊन  खाजगी चॅट्स तपासले आणि नंतर तो फोन आपल्या खोलीत नेला; असाही दावा महिलेने केला होता.

बळजबरीने खोलीत नेलं आणि..

रेड्डी याने तिला बेकायदेशीरपणे अडवून ठेवलं, बळजबरीने आपल्या खोलीत नेलं, शारीरिक हल्ला केला, माझे केस ओढले, गळा आवळण्याचा प्रयत्न केला आणि तिला तिथून बाहेर पडण्यापासून रोखत गळ्याशी चाकू लावला, असाही आरोप संबंधित महिलेने पुढे लावला. याच दरम्यान त्याने  माझ्यावर कंडोमची पाकिटे भिरकावली, असा दावाही तिने केला. तसेच, 10 जुलै रोजी आपल्यावर आणखी एक हल्ला झाला आणि त्यादरम्यान त्याने मला अयोग्यरित्या स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, असे अनेक आरोप संबंधित महिलेने लावले.

रेड्डीने गुप्तपणे आपला प्रायव्हेट व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि नंतर ब्लॅकमेल करण्यासाठी तो व्हिडीओ पतीला पाठवल्याचंही तिने तक्रारीत म्हटलं होतं. आपल्याबद्दल चुकीची माहिती पसरवून आपली प्रतिमा त्याने खराब केली असे अनेक आरोप तिने केले होते.

आम्ही रिलेशनमध्ये होते, रेड्डीचा दावा

मात्र या सगळ्या आरोपानंतर रेड्डीने विष प्राशनाचा प्रयत्न केला. त्यापूर्वी त्याने दोन पानी चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीत त्याने आपल्यावरील आरोप फेटाळून लावले. मी विरोध करूनही ती महिला बळजबरीने माझ्या खोलीत आली होती; तसेच, तिचे लग्न झाल्यानंतरही आमचे शारीरिक आणि भावनिक संबंध कायम होते, असा आरोपही रेड्डी यांनी केला होता. “मी, उदय कृष्ण रेड्डी आणि ती महिला जून 2025 पासून एकमेकांच्या संपर्कात (रिलेशनशिपमध्ये) आहोत. त्यानंतरही आमचे शारीरिक आणि भावनिक संबंध कायम होते. ती स्वतःहून माझ्या खोलीवर आली (तिने व्हॉट्सॲप चॅट्समध्ये अनेकदा मला खोली उघडण्यास सांगितले होते) आणि तिनेच वाद सुरू केला. मी पुराव्यासाठी त्या घटनांचे माझ्या फोनवर रेकॉर्डिंग केले. केवळ स्वतःच्या बचावासाठीच मी तिला प्रतिसाद दिला; याचा व्हिडिओ पुरावा उपलब्ध आहे” असा दावा त्याने चिठ्ठीत केला.

ती माझ्या खोलीत आली आणि माझ्या संमंतीशिवाय किस केलं

एवढंच नव्हे तर ” 9 जुलै रोजी ती स्वतःहून माझ्या खोलीत आली. माझी संमती नसताना तिने मला किस केलं आणि मिठी मारली. त्यामुळे, पुरावा म्हणून मी त्याचे रेकॉर्डिंग केलं आणि ते तिच्या पतीला (नाव) पाठवलं; कारण, वारंवार माझ्या खोलीत येऊ नकोस, असे मी तिला यापूर्वीच सांगितले होते” असंही त्याने चिठ्ठीत नमूद केलं. मात्र नंतर त्या महिलेने “सर्व काही फिरवून सांगितलं” आणि मीच तिच्यावर हल्ला केल्याचा आरोप केला असा दावा रेड्डीनी केला. माझ्यावर लावलेले आरोप खरे नाहीत. आपल्या मित्र-मैत्रिणींच्या चिथावणीनंतरच त्या महिलेने ही तक्रार दाखल केली होती, असा दावाही करत रेड्डी यांनी त्या महिलेविरुद्ध तसेच तिचा पती व अन्य दोघांविरुद्ध कारवाईची मागणी केली.

दरम्यान या आरोपांची चौकशी सुरू असून गोळा केलेल्या पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं.

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ