AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट

Ram Mandir Case : देशभरात गाजत असलेल्या अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरणात महत्वाची अपडेट आहे. SIT ची चौकशी आता महत्वाच्या टप्प्यावर आहे. विरोधी पक्षांनी हा मुद्दा लावून धरला आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यावरुन आंदोलन करत आहेत.

Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट
Ram Mandir
| Updated on: Jul 22, 2026 | 7:36 AM
Share

अयोध्येतील राम मंदिर हे देशातील कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान आहे. याच राम मंदिरात दोन चोरीची घटना घडली आहे. देशातील विरोधी पक्षांनी हा मुद्दा लावून धरला आहे. उत्तर प्रदेश सरकारने दोन चोरीसाठी SIT ची स्थापना केली आहे. आता या तपासाबाबत महत्वाची अपडेट आहे. राम मंदिर दान चोरी प्रकरणात चौकशी करणाऱ्या तीन सदस्यीय SIT ची फिल्ड इनक्वायरी पूर्ण झाली आहे. एसआयटीने या प्रकरणात 70 पेक्षा जास्त लोकांची जबानी नोंदवून घेतली आहे. आता चौकशी महत्वाच्या टप्प्यात आहे. पुराव्यांचं विश्लेषण सुरु आहे. ट्रस्टचे वरिष्ठ पदाधिकारी सुद्धा चौकशीच्या फेऱ्यात आहेत. मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी झाली आहे.

सुरक्षा कर्मचारी आणि आऊटसोर्स कर्मचाऱ्यांची जबानी नोंदवली आहे. कॅश मॅनेजमेंटशी संबंधित बँक अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी झाली आहे. वेगवेगळ्या लोकांच्या जबानीमध्ये जी तफावत आढळून आलीय, त्याचा आता SIT कडून तपास सुरु आहे. SIT ने रेकॉर्ड आणि कागदपत्रांच्या आधारावरील साक्षी यांचा तपास जवळपास पूर्ण केला आहे. आता चौकशी समिती उपलब्ध साक्ष,पुराव्यांचा बारकाईने विश्लेषण करत आहे. कागदपत्रं आणि साक्षीदारांनी दिलेली जबानी यात किती तफावत आहे, त्याचा शोध एसआयटीकडून घेतला जात आहे.

एसआयटीचा कार्यकाळ 30 जुलैपर्यंत वाढवला

दानचोरी प्रकरणात जो घटनाक्रम आहे, त्याचं क्रमवार पूननिर्माण सुरु आहे. अंतिम रिपोर्टमध्ये प्रत्येक निष्कर्षाला ठोस आधार दिला जाईल. यूपी सरकारने एसआयटीचा कार्यकाळ 30 जुलैपर्यंत वाढवल्याची सूत्रांची माहिती आहे. अतिरिक्त वेळ ही पुरावे गोळा करण्यासाठी नाही, तर आधीपासून जे पुरावे उपलब्ध आहेत, त्याच्या सखोल विश्लेषणासाठी मिळाली आहे. दान चोरी कशामुळे शक्य झाली, हे शोधून काढणं एसआयटीचं मुख्य लक्ष्य आहे. प्रशासकीय पातळीवर यासाठी कोण जबाबदार आहे हे सुद्धा निश्चित केलं जाईल.

काय रेकॉर्ड तपासले?

SIT ने दान संग्रहापासून मोजणी पर्यंतचे रेकॉर्ड तपासले आहेत. मिळालेल्या दानाची वाहतूक, स्टोरेज आणि सुरक्षा व्यवस्थेच्या अंगाने तपास झाला. कॅश कस्टडी आणि त्यावर नजर ठेवण्याच्या व्यवस्थेची सुद्धा चौकशी झाली आहे. प्रशासनिक तंत्र आणि SOP पालनाची समीक्षा झाली आहे. ऑडिट आणि सुपरविजय या अंगाने सुद्धा तपास झाला आहे.

सुरक्षा उपायोजना कुठे आणि कशा फेल गेल्या?

व्यक्तिगत पातळीवर कोणाची जबाबदारी होती इथपर्यंतच एसआयटीचा तपास मर्यादीत नाही. तर ही चोरी कशा पद्धतीने सुरु होती, दान प्राप्त झाल्यानंतर मोजणी, कस्टडी, देखरेख आणि ऑडिट या सगळ्यांची जबाबदारी निश्चित होईल. प्रत्येक स्तरावरील सुरक्षा व्यवस्था आणि नियंत्रण याची समीक्षा केली जाईल. सुरक्षा उपायोजना कुठे आणि कशा फेल गेल्या हे शोधण्याचा प्रयत्न होईल.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...