AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मतदारांना पैसे वाटपाची तक्रार, निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर, नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना ते थेट आदेश

Nashik Legislative Council Elections: नाशिकमधून एक मोठी अपडेट समोर येत आहे. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतर आता एक मोठी खेळी समोर येत आहे. मतदारांना पैसे वाटपाची तक्रार समोर आली होती. त्यावर केंद्रीय निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर आला आहे.

मतदारांना पैसे वाटपाची तक्रार, निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर, नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना ते थेट आदेश
गोकुळ गिते, नरेंद्र दराडे
| Updated on: Jul 22, 2026 | 10:50 AM
Share

Nashik Legislative Council Elections: नाशिकमधील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत गोकुळ गिते यांनी मैदान मारले होते. ते महायुतीला चांगलेच नडले होते. त्यांचे मन वळविण्याचा आणि महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना निवडून आणण्याचा आटापीटा करण्यात आला होता. पण गोकुळ गिते हे सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले होते. निवडणुकीनंतर कथित आर्थिक व्यवहार आणि मतदारांना पैसे वाटपाच्या आरोपांमुळे वाद निर्माण झाला होता. याप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत गोकुळ गिते यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. त्यांची मिन्नतवार करताना महायुतीचे नाकीनऊ आले होते. संकटमोचक मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री उदय सामंत हे दोघेही अखेरपर्यंत नाशकात तळ ठोकून होते. गोकुळ गिते यांच्या भावाने उमेदवारी मागे घेतली होती तर त्यांनी उमेदवारी कायम ठेवली होती. महायुतीला ते चांगलेच नडले होते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ते विजयी झाले होते. महायुतीला हा मोठा धक्का होता. त्यानंतर लागलीच गिते यांनी शिवसेनेत प्रवेश केला. हा चेकमेट देण्याचा प्रकार असल्याचा आरोप होत होता.

आता होणार चौकशी

नाशिक विधान परिषद निवडणुकीतील कथित पैशांच्या वाटपाची केंद्रीय निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तक्रारीतील प्रत्येक मुद्द्याची सखोल चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी संबंधित यंत्रणेला आदेश दिले आहेत. या नवीन अपडेटमुळे नाशिक जिल्ह्यात आता चर्चेला पेव फुटले आहेत.

नाशिक विधान परिषद निवडणुकीत नरेंद्र दराडे विरुद्ध गोकुळ गीते यांच्यात लढत झाली होती. महायुतीकडे बहुमत असताना देखील गोकुळ गीते यांनी नरेंद्र दराडे यांचा पराभव केला होता. याच निकालानंतर आमदार किशोर दराडे यांनी पैसे दिल्याचा माध्यमांसमोर काही ठिकाणी उल्लेख केला होता.

आता चौकशी कशाची होणार?

केंद्रीय निवडणूक आयोगाने पैसे वाटप झाल्याच्या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित यंत्रणेला याविषयीचा अहवाल सादर करावा लागणार आहे. प्रकरणात नेमके पैसे कुणाला दिले आणि किती दिले या संदर्भात चौकशी होण्याची शक्यता आहे. निवडणुकीनंतर कथित आर्थिक व्यवहार आणि मतदारांना पैसे वाटपाच्या आरोपांमुळे वाद निर्माण झाला होता. त्याअनुषंगाने चौकशी होईल. तक्रारदार संजय काळे यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करून कायमस्वरूपी अपात्र ठरविण्याची मागणी केली आहे. या सर्व घाडमोडींमुळे भाजप आणि शिवसेना यांच्यात वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...