AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी काल तब्बल तीन तास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं.पोलिसांनी त्यांना ताब्यातही घेतलं होतं. हे आंदोलन का केलं? त्या बद्दल राहुल गांधी यांनी आता खुलासा केला आहे.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा
Rahul Gandhi
| Updated on: Jul 22, 2026 | 8:17 AM
Share

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी काल तब्बल तीन तास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं.पोलिसांनी त्यांना ताब्यातही घेतलं होतं. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर काँग्रेसने मंगळवारी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आणि विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणी विरोधात थेट पंतप्रधान निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं. राहुल गांधी यांनी काल रात्री सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करुन आंदोलन का केलं? ते सांगितलं. “मी आज सकाळी लोकसभा अध्यक्षांकडे गेलो, त्यांना म्हटलं काल विद्यार्थ्यांसोबत जे झालं त्यावर चर्चा करायची परवानगी आम्हाला द्यावी. त्यावर अध्यक्षांनी आम्हाला सांगितलं की, मला सरकारकडून परवानगी घ्यावी लागेल. पण आम्हाला स्पष्ट झालं की, सरकारला चर्चा करण्यात काही इंटरेस्ट नाही. पण आम्ही ठरवलं की पंतप्रधानांच्या घरासमोर जाऊन ठिय्या आंदोलन द्यायचं” असं राहुल गांधी म्हणाले.

“जे विद्यार्थ्यांचे मुद्दे आहेत, देशासाठी महत्वाचे मुद्दे आहेत, जे त्यांच्याविरोधात केलय, ते देशासमोर आणायचं आणि पंतप्रधानांच्या घरासमोर जाऊन करायचं. भारतात शिक्षण व्यवस्था का अपयशी ठरतेय? पेपर का लीक होत आहेत? भारतात शिक्षण इतक महाग का आहे? मुलांच्या शिक्षण खर्चाचा भार वाहतान कुटुंब का उद्धवस्त होत आहेत?” असे सवाल राहुल गांधी यांनी विचारले. “हे सर्व योग्य प्रश्न आहेत. त्यात काही चुकीच नव्हतं असं ते म्हणाले.

राहुल गांधी यांच्या काय मागण्या?

“आम्हाला धर्मेंद्र प्रधान आणि अमित शाह यांचा राजीनामा हवा आहे. ज्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. विद्यार्थ्यांवर ज्या केसेस आहेत, त्या मागे घ्याव्यात” अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. “लोकसभेचा विरोधी पक्ष नेता म्हणून माझी मागणी आहे की, उद्या लोकसभा आणि राज्यसभेत या विषयावर चर्चा व्हावी. आम्हाला आमचा मुद्दा मांडू द्यावा. तुमच्या सरकारने, गृहमंत्र्यांनी जे केलं, त्यासाठी तुम्ही देशांच्या मुलाची माफी मागा. लवकरात लवकर परीक्षा व्यवस्था आणि शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करा” अशा मागण्या राहुल गांधी यांनी केल्या.

Follow Us
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला...
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला गुन्हा दाखल, थेट...
राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी
Dahi Handi in Mumbai | हजारो तरुणांनी मैदान फुललं! राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी; हजारो तरुणाईचा जल्लोष
ठाण्यात दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला; राजकीय नेत्याचा गोविंदा पथक...
ठाण्यात दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला; राजकीय नेत्याचा गोविंदा पथकांना मोठं आवाहन