AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NZ vs SA : कॅप्टन मिचेल सँटनरकडून पुन्हा तशीच चूक, वर्ल्ड कप गमावल्यानंतरही सुधारणा नाही

New Zealand vs South Africa 1st T20i : न्यूझीलंड क्रिकेट टीमचा कॅप्टन मिचेल सँटनर याने आठवड्याभरात दुसऱ्यांदा तशीच चूक केली आहे. त्यामुळे न्यूझीलंडला सलग दुसरा टी 20i सामना गमवावा लागला.

NZ vs SA : कॅप्टन मिचेल सँटनरकडून पुन्हा तशीच चूक, वर्ल्ड कप गमावल्यानंतरही सुधारणा नाही
Mitchell Santner New Zealand CaptainImage Credit source: Icc X account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 16, 2026 | 5:05 AM
Share

माणूस चुकांमधून धडा घेतो आणि भविष्यात पुन्हा तशी चूक करत नाही. चूक करणं चुकीचं नसून वारंवार तीच चूक करणं चुकीचं असतं, असं म्हणतात. मात्र न्यूझीलंडचा टी 20i कर्णधार मिचेल सँटनर याने गेल्या चुकीतून काहीच धडा घेतला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे कर्णधाराच्या एका निर्णयाने न्यूझीलंडची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेत पराभवाने सुरुवात झाली आहे. सँटनरचं नक्की काय चुकलं ज्यामुळे त्यांना पहिल्या सामन्यात पराभूत व्हावं लागल्याचं म्हटलं जातंय? याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.

न्यूझीलंड क्रिकेट टीमला 8 मार्च रोजी आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध पराभूत व्हावं लागलं. टीम इंडियाने एकतर्फी फरकाने मिळवलेल्या विजयामुळे न्यूझीलंड पुन्हा एकदा आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरली. न्यूझीलंडला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागंल. वर्ल्ड कप फायनलमध्ये सँटनर मोठी चूक केलेली जी काही प्रमाणात न्यूझीलंडच्या पराभवासाठी कारणीभूत ठरली होती. मात्र सँटनरने आठवड्याभरात वर्ल्ड कप फायनलमधील चुकीची पुनरावृत्ती केली. परिणामी न्यूझीलंडचा पराभव झाला, असं म्हटलं जातंय.

मिचेल सँटनरचं काय चुकलं?

सँटनरने वर्ल्ड कप फायनलमध्ये टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं होतं. भारताने या संधीचा फायदा घेत 250 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. भारताने अंतिम सामन्यात 255 धावा केल्या. त्यानंतर न्यूझीलंडचा विजयी धावांचा पाठलाग करताना पराभव झाला. सँटनरने रविवारी 15 मार्चला तशीच चूक केल्याने न्यूझीलंडला 7 विकेट्सने पराभूत व्हावं लागलंय.

रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी 20i सामन्यात सँटनरच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. सँटनरने बॅटिंगसाठी प्रतिकूल असलेल्या खेळपट्टीवर फलंदाजीचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने या संधीचा चांगलाच फायदा घेतला. दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला 91 धावांवर गुंडाळलं आणि सँटनरचा बॅटिंग करण्याचा निर्णय चुकीचा ठरवला. त्यामुळे सँटनरवर या पराभवाचं खापर फोडलं जात आहे.

दक्षिण आफ्रिकेचा विजय

दक्षिण आफ्रिकेने त्यानंतर हे 92 धावांचं आव्हान 20 बॉलआधी पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिकेने 16.4 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 93 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारे हा सामना 7 विकेट्सने आपल्या नावावर केला.

दुसरा टी 20i सामना कधी?

दरम्यान उभयसंघातील दुसरा टी 20i सामना हा मंगळवारी 17 मार्च रोजी होणार आहे. न्यूझीलंड हा सामना जिंकून मालिकेत कमबॅक करण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल