Chanakya Niti : या चार गोष्टी कायम लक्षात ठेवा, म्हातारपणात राहाल स्वावलंबी, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात माणसाला आपल्या म्हातारपणात देखील स्वावलंबीपणाने जगता आलं पाहिजे, त्यासाठी चाणक्य यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य म्हणतात तरुण पणामध्ये माणसाला कोणाचीही गरज नसते, माणसाला फक्त आपल्या दोनच अवस्थांमध्ये इतरांवर अवलंबून राहावं लागतं, एक म्हणजे तुमचं बालपण आणि दुसरं म्हातारपण बालपणात तुम्हाला इतरांवर अवलंबून राहावच लागतं कारण तुमच्या हातात त्या अवस्थेमध्ये काहीही नसतं. आणि त्यावेळी तुमचे आई-वडील तुमच्यासोबत असतात. ज्या व्यक्तीसोबत त्याचे आई वडील आहेत, त्याला या जगातली कोणतीच शक्ती कधीच हरवू शकत नाही. परंतु म्हातारपणात मात्र स्थिती या उलट असते, तुमचे आई वडील तुमच्यासोबत नसतात, मात्र तरी देखील तुम्हाला जवळपास प्रत्येक गोष्टींसाठी इतरांवर अवलंबून राहावं लागतं, अशावेळी लोकांना तुमचा त्रास वाटायला लागतो. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आणि म्हातारपणात देखील आयुष्य स्वावलंबीपणाने जगण्यासाठी चाणक्य यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत, जर तुम्ही या गोष्टींचं पालन केल तर तुम्ही म्हातारपणात देखील नक्कीच स्वावलंबी जीवन जगाल.
पैशांची बचत – चाणक्य म्हणतात तरुणपणात तुम्ही पैसे कमवत असता, त्यामुळे तेव्हा तुम्हाला पैशांची फारशी गरज नसते. परंतु वृद्धापकाळात तुमचं शरीर थकतं, तुम्ही काम करू शकत नाहीत. तेव्हा तुम्हाला खरी पैशांची गरज असते, अशा वेळी जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्हाला ते इतरांना मागावे लागतील, त्यामुळे स्वावलंबी जीवन जगण्यासाठी पैशांची बचत करा.
माणसं जोडा – चाणक्य म्हणतात तरुणपणातच माणसं जोडा. हीच माणसं तुम्हाला पुढे म्हातारपणात तुमच्या उपयोगी येणार आहेत. तुम्ही आता जर माणसांना जपलं तर ती देखील तुम्हाला तुमच्या वृद्धापकाळात मदत करतील, असं चाणक्य म्हणतात.
राग – चाणक्य म्हणतात म्हातारपणात माणसाला राग खूप लवकर येतो, पण रागावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे.
आरोग्य – चाणक्य म्हणतात तरुणपणात तुम्ही तुमच्या आरोग्याची जेवढी काळजी घ्याल, तेवढं तुम्ही वृद्धापकाळात ठणठणीत राहाल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
