AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan Police Attack : ज्याची भीती शेवटी तेच घडलं, भयानक हल्ल्याने पाकिस्तान हादरला, 11 पोलिसांचा मृत्यू!

कोहाट आणि करक जिल्ह्याच्या मध्ये असलेल्या जलंधर बांदा या भागात झालाय. हल्लेखोरांनी पोलिसांवर गोळीबार केल्यानंतर पोलिसांच्या पाच वाहनांना आग लावली. ही भयानक घटना समोर आल्यानंतर खैबर पख्तुनख्वा या भागात एकच खळबळ उलाडी आहे.

Pakistan Police Attack : ज्याची भीती शेवटी तेच घडलं, भयानक हल्ल्याने पाकिस्तान हादरला, 11 पोलिसांचा मृत्यू!
pakistan police attackImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 11, 2026 | 9:21 PM
Share

Pakistan Police Attack : जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जवानांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला आहे. या घटनेने काश्मीरमध्ये लष्कर अलर्ट मोडवर आहे. पाकिस्तानकडून पोसल्या जाणाऱ्या दहशतवाद्यांनीच हा हल्ला केलाय, असा दावा केला जातोय. दरम्यान आता दहशतवाद पोसणाऱ्या या पाकिस्तानलाही जबर धक्का बसलाय. पाकिस्तानात एका पोलिसांच्या टीमवर थेट हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात 11 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून तिथे एकच खळबळ उडाली आहे.

पाकिस्तानी सरकारपुढे मोठे आव्हान

गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानमध्ये पोलिसांवर, लष्करावर हल्ला करण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी सुरक्ष रक्षकांचा मृत्यूही झाला आहे. देशांतर्गतच होत असलेल्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानी सरकारपुढे मोठे आव्हान निर्माण झालेले आहे. अशा प्रकारचे हल्ले होऊ नयेत यासाठी पाकिस्तानकडून वेळोवेळी रणनीती आखण्यात आलीय. परंतु आता या रणनीतीचा काहीही फायदा झालेला नाही, असे आता स्पष्ट होत आहे.

हल्ला नेमका कुठे झाला? काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील कोहाट जिल्ह्यात ही घटना घडली. येथे बंदूक घेऊन हशतवादी आले. त्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात एकूण 11 पोलिसांचा मृत्यू झाला. तर इतर 12 पोलीस जखमी झाले. या घटनेबाबत एक्स्प्रेस ट्रिब्यूनने सविस्तर वृत्त दिलंय. या वृत्तानुसार अवैध पद्धतीने सोन्याचे उत्खनन होत असताना त्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांची एक टीम मोहिमेवर होती. याच वेळी रात्री दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी पोलिसांच्या टीमवर गोळीबार सुरू केला. यातच 11 पोलिसांचा मृत्यू झाला तर 12 पोलीस जखमी झाले. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

गोळीबार करून वाहनांना आग लावली

हा हल्ला कोहाट आणि करक जिल्ह्याच्या मध्ये असलेल्या जलंधर बांदा या भागात झालाय. हल्लेखोरांनी पोलिसांवर गोळीबार केल्यानंतर पोलिसांच्या पाच वाहनांना आग लावली. ही भयानक घटना समोर आल्यानंतर खैबर पख्तुनख्वा या भागात एकच खळबळ उलाडी आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उपस्थित झालाय. या प्रकरणाची चौकशी केली जातेय.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!