AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त 10 हजार रुपयांमध्ये फिरा भारतातील ही 3 सुंदर ठिकाणं, एकदा गेलात तर पुन्हा-पुन्हा जाल

10 हजार रुपयांच्या बजेटमध्ये करा भारतातील या 3 सुंदर ठिकाणांची सफर. कमी खर्चात घेता येईल पर्यटनाचा आनंद. एकदा गेलात तर पुन्हा-पुन्हा होते जाण्याची इच्छा.

फक्त 10 हजार रुपयांमध्ये फिरा भारतातील ही 3 सुंदर ठिकाणं, एकदा गेलात तर पुन्हा-पुन्हा जाल
Image Credit source: Social media
| Updated on: Nov 11, 2026 | 9:08 PM
Share

कमी बजेटमध्ये फिरायला जायचं असेल तर परदेशात किंवा महागड्या पर्यटनस्थळांवर जाण्याची गरज नाही. भारतातच अशी अनेक सुंदर ठिकाणं आहेत, जिथे तुम्ही निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वास्तू आणि समुद्रकिनाऱ्यांचा आनंद घेऊ शकता. विशेष म्हणजे, योग्य नियोजन आणि बजेट फ्रेंडली हॉटेलची निवड केल्यास 10 हजार रुपयांच्या आतही या ठिकाणांची सहल करता येऊ शकते. कोणती आहेत ती ठिकाणं? जाणून घेऊयात सविस्तर.

मॅकलोडगंज

हिमाचल प्रदेशातील मॅकलोडगंज हे निसर्गप्रेमी आणि ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांसाठी उत्तम पर्यटनस्थळ आहे. येथील सुंदर पर्वतरांगा, हिरवळ आणि शांत वातावरण पर्यटकांना आकर्षित करते. दिल्ली किंवा चंदीगडहून धर्मशाळा आणि मॅकलोडगंजसाठी बसने प्रवास करता येतो. येथे बौद्ध मठ, भागसूनाग धबधबा आणि स्थानिक कॅफे पाहण्यासारखे आहेत. साहसी पर्यटनाची आवड असल्यास त्रिउंड ट्रेकचाही आनंद घेता येतो. येथे कमी किमतीत हॉटेल, हॉस्टेल आणि स्थानिक खाद्यपदार्थांचे पर्याय उपलब्ध आहेत.

हम्पी

कर्नाटकातील हम्पी हे ऐतिहासिक पर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. येथे प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक वास्तू आणि सुंदर निसर्ग पाहायला मिळतो. विरुपाक्ष मंदिर, विठ्ठल मंदिर, मातंग टेकडी आणि तुंगभद्रा नदी ही येथील प्रमुख आकर्षणं आहेत. मातंग टेकडीवरून दिसणारा सूर्यास्त पर्यटकांसाठी खास अनुभव ठरतो. हम्पी फिरण्यासाठी स्थानिक वाहतुकीऐवजी स्कूटर भाड्याने घेण्याचा पर्यायही निवडता येतो. येथे कमी बजेटमधील हॉटेल आणि होमस्टे सहज मिळतात.

गोकर्ण

कर्नाटकातील गोकर्ण हे समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. गर्दीपासून दूर शांत वातावरणात सुट्ट्या घालवायच्या असतील, तर हे ठिकाण उत्तम पर्याय ठरू शकते. येथे ओम बीच, कुडले बीच आणि हाफ मून बीच यांसारखे सुंदर समुद्रकिनारे पाहता येतात. समुद्रकिनाऱ्यावरील कॅफे आणि शॅक्समध्ये दक्षिण भारतीय पदार्थांसह सी-फूडचाही आस्वाद घेता येतो. कमी किमतीतील हॉस्टेल आणि होमस्टेमुळे बजेटमध्ये राहण्याची सोय होऊ शकते.

कमी बजेटमध्ये सहलीचे नियोजन कसे कराल?

प्रवासासाठी शक्यतो ट्रेन किंवा साध्या बसचा पर्याय निवडा.

महागड्या हॉटेलऐवजी हॉस्टेल किंवा बजेट फ्रेंडली होमस्टेमध्ये राहा.

स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्या.

प्रवासाचे तिकीट आणि राहण्याची व्यवस्था आधीच बुक करा.

अनावश्यक खर्च टाळून सहलीचे नियोजन करा.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!