AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही दोन झाडं घराच्या आसपास नकोच, असते सापांची अंडी देण्याची सर्वात आवडती जागा, एखादातरी साप दिसतोच

भारतामध्ये सापांच्या हजारो प्रजाती आढळून येतात, प्रत्येकाचं वैशिष्ट हे वेगळं आहे, काही सापांच्या जाती या अंडी घालतात, तर काही सापांच्या प्रजाती या थेट पिल्लांना जन्माला घालतात. साप अनेकदा अंडी घालण्यासाठी सुरक्षित जागेची निवड करतात. ते काही विशिष्ट झाडांच्या ठिकाणी देखील अंडी घालतात.

ही दोन झाडं घराच्या आसपास नकोच, असते सापांची अंडी देण्याची सर्वात आवडती जागा, एखादातरी साप दिसतोच
SnakeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 11, 2026 | 9:29 PM
Share

भारतामध्ये सापांच्या हजारो प्रजाती आढळून येतात. यातील काही साप हे विषारी आहेत, तर काही साप हे बिनविषारी आहेत. प्रत्येकाचं वैशिष्ट देखील वेगवेगळं आहे. काही साप हे थेट पिल्लांना जन्माला घालतात, तर काही साप हे अंडी घालतात. सापांचा अंडे घालण्याचा किंवा पिल्लांना जन्म देण्याचा देखील एक विशिष्ट हंगाम असतो. भारतामध्ये असे देखील काही साप आहेत, जे एकाचवेळी तीस ते चाळीस पिल्लांना देखील जन्माला घालू शकतात. त्यामुळेच अशा सापांची संख्या झपाट्याने वाढते. मात्र तुम्हाला कुठेही अशा प्रकारची अंडी दिसली किंवा साप दिसला तर त्याची माहिती सर्पमित्रांना द्यावी, ते सापांना आणि त्याच्या अंड्याला सुरक्षित ठिकाणी सोडतील, ज्यामुळे तुम्हालाही धोका होणार नाही, आणि सापांची अंडी देखील सुरक्षित राहातील.

सापांच्या आणि पक्ष्याच्या अंड्यामधील फरक 

सर्वासामान्यपणे दूरून पाहिलं तर सापांची आणि पक्षाची अंडी ही सारखीच वाटू शकतात. परंतु जवळ जाऊन पाहिलं तर तुम्हाला साप आणि पक्ष्याच्या अंड्यामधील फरक स्पष्ट दिसेल. पक्षाच्या अंड्याचं कवच हे थोडं टणक असतं, तुलनेनं सापाच्या अंड्याचं कवच हे चामड्यासारखं असतं, म्हणजे तुम्ही ते जर दाबले तर ते न तुटता थोडं दबलं जातं, मात्र पक्षाच्या अंड्याचं शेल दबलं जात नाही. सापाची अंडी ही लंबर्वतुळाकार असतात, तर पक्षाची अंडी ही थोडी गेलसर असतात. हा सापांच्या आणि पक्ष्याच्या अंड्यामधील नैसर्गिक फरक आहे.

सामान्यपणे सााप अशा ठिकाणी अंडी घालतात, जिथे कायम ओलावा असतो. किंवा आर्द्रता युक्त वातावरण असते. जमीन भुसभुशीत असते. जवळपास उंदरांचे बीळ असतील. कारण सापाने एकदा अंडे घातल्यानंतर तो त्या अंड्यांना सोडून फार दूरवर कुठे जात नाही, तो तिथेच असतो. त्यामुळे लवकर शिकार मिळेल या उद्देशाने तो अशाच ठिकाणी अंडी घालतो, जिथे उंदीर किंवा पक्ष्यांची घरटी असतील. सर्वसामान्यपणे बांबूचं झाडं असं असतं की, बांबूच्या मुळाशी नेहमी ओल असते, त्यामुळे साप शक्यतो अशाच ठिकाणी आपली अंडी घालतो. तसेच या परिसरात दाट पालापाचोळा पडत असल्यामुळे उंदीर, घुशी या सारख्या प्राण्याची संख्या देखील अधिक असते. बांबूप्रमाणेच जिथे वडाच्या झाडाचा घेर जास्त असतो, अशा झाडाखाली लवकर कोणाची नजर पडणार अशा ठिकाणी साप अंडी घालू शकतात.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!