AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : घराचा मुख्य दरवाजा कसा असावा? पाहा वास्तुशास्त्र काय सांगतं?

वास्तुशास्त्राला हिंदू धर्मशास्त्रामध्ये महत्त्वाचं माण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात जेवढी काय नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जा येते, ती तुमच्या घराच्या मुख्य दरवाजामधूनच येत असते, त्यासाठी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाची रचना कशी असावी याची माहिती देखील वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आली आहे.

Vastu Shastra : घराचा मुख्य दरवाजा कसा असावा? पाहा वास्तुशास्त्र काय सांगतं?
vastushtraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 11, 2026 | 9:43 PM
Share

वास्तुशास्त्रामध्ये तुमच्या घराची रचना कशी असावी याची माहिती देण्यात आली आहे, जसं की तुमचं स्वयंपाक घर कोणत्या दिशेला असावं? तुमच्या बेडरूमची दिशा कोणती असावी? तुमचं देवघर कोणत्या दिशेला असावं? घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा? या सर्व गोष्टींची वास्तुशास्त्रामध्ये माहिती देण्यात आली आहे. जेव्हा यापैकी एखाद्या घटकाची देखील दिशा चुकते तेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रामध्ये तुमच्या घराचा मुख्य दरवाजा सगळ्यात महत्त्वाचा माण्यात आला आहे. कारण वास्तुशास्त्रानुसार याच दरवाजामधून तुमच्या घरात नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते, जेव्हा तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, तेव्हा तुम्हाला त्याचे अनेक लाभ मिळतात. जसं की घराची भरभराट होते, घरात सुख समृद्धी येते. नोकरीत प्रमोशन, व्यवसायात नफा मिळतो.

परंतु हेच जेव्हा तुमच्या घरात सातात्याने नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते, तेव्हा हळुहळु तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होऊ लागतो. घरातील ऊर्जा संतुलन बिघडतं त्याचे अनेक नकारात्मक परिणाम तुम्हाला पहायला मिळतात. जसं की घरात काहीही कारण नसताना सारखे वाद होतात. हातात आलेला पैसा टिकत नाही, पैसा खर्च होतो. घरातील ऊर्जा संतुलन टिकवून ठेवण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजाची रचना कशी असावी? याबद्दल वास्तुशास्त्रामध्ये काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, त्याबद्दलच आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल.

वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराची चौकट ही नेहमी उंच असावी, म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती तुमच्या घराच्या मुख्य दरवाजामधून घरात प्रवेश करेल तेव्हा त्याला खाली वाकण्याची गरज पडली नाही पाहिजे, तसेच तुमच्या मुख्य घराच्या दरवाजाचा उंबरा हा अधिक सुस्पष्ट तसेच ठळक थोडा उंच असावा, एवढंच नाही तर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाची चौकट ही इतर दरवाजांच्या चौकटीपेक्षा थेटी मोठी असावी.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!