AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Election Commission | विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद

Election Commission | विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद

| Updated on: Mar 15, 2026 | 5:01 PM
Share

केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन आगामी विधानसभा निवडणुकांबाबत महत्त्वाची माहिती दिली. या पत्रकार परिषदेत निवडणुकांच्या तयारीबाबत तसेच निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष ठेवण्यासाठी आयोगाने केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, देशातील निवडणुका शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी आयोग कटिबद्ध आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन आगामी विधानसभा निवडणुकांबाबत महत्त्वाची माहिती दिली. या पत्रकार परिषदेत निवडणुकांच्या तयारीबाबत तसेच निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष ठेवण्यासाठी आयोगाने केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, देशातील निवडणुका शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी आयोग कटिबद्ध आहे. निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला किंवा मतदारांवर दबाव टाकण्याच्या प्रकारांना अजिबात सहन केले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि संबंधित अधिकारी यांच्यासोबत समन्वय साधून आवश्यक तयारी पूर्ण करण्यात येत असल्याची माहिती आयोगाने दिली. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, काही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आल्याची माहितीही देण्यात आली. निवडणूक जाहीर होताच संबंधित राज्यांमध्ये आचारसंहिता लागू होणार असून त्यानंतर निवडणूक प्रक्रियेला अधिकृत सुरुवात होणार आहे. निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्ष, उमेदवार आणि मतदारांना निवडणूक प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. लोकशाही मजबूत करण्यासाठी मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका होणे अत्यंत आवश्यक असल्याचे आयोगाने यावेळी स्पष्ट केले.

Published on: Mar 15, 2026 05:01 PM
Follow Us