AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेचं आता काही खरं नाही, टप्प्यात आल्यास करेक्ट कार्यक्रम… सर्वात मोठ्या शत्रूची थेट धमकी, डोनाल्ड ट्रम्प यांना फुटला घाम

Donald Trump : इराणविरुद्धच्या युद्धामुळे अमेरिकेची अडचण वाढण्याची शक्यता आहे. कारण आता इतरही देशांनी सावध भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. एका बड्या शत्रूने अमेरिकेला थेट धमकी दिली आहे.

अमेरिकेचं आता काही खरं नाही, टप्प्यात आल्यास करेक्ट कार्यक्रम... सर्वात मोठ्या शत्रूची थेट धमकी, डोनाल्ड ट्रम्प यांना फुटला घाम
Trump SadImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 15, 2026 | 11:18 PM
Share

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जगभरातील देशांची झोप उडालेली आहे. अशातच आता या युद्धामुळे अमेरिकेची अडचण वाढण्याची शक्यता आहे. कारण आता इतरही देशांनी सावध भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग ऊन यांनी आपल्या मुलीसोबत रॉकेट लॉन्च सिस्टमच्या चाचण्यांचे निरीक्षण केले आहे. उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांनी रविवारी ही माहिती दिली आहे. हे पाऊल अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्या सुरू असलेल्या संयुक्त लष्करी सरावाला दिलेले उत्तर मानले जात आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

उत्तर कोरियाने अलीकडेच अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या संयुक्त लष्करी सरावांना प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली होती. दोन्ही देशांचा फ्रीडन शील्ड नावाचा लष्करी सराव सुरू आहे, ज्याला उत्तर कोरिया आपल्या विरोधातील संभाव्य हल्ल्याची तयारी मानतो. सरकारी वृत्तसंस्था कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार किम यांनी शनिवारी उत्तर कोरियाच्या पूर्व किनाऱ्याजवळ 12 हाय प्रिसिजन असलेल्या 600 मिमी कॅलिबर रॉकेट लॉन्चर्सच्या चाचण्या पाहिल्या.

किम जोंग उन यांचा थेट अमेरिकाला इशारा

दक्षिण कोरियाच्या सैन्याने सांगितले की उत्तर कोरियाने शनिवारी पूर्व समुद्राच्या दिशेने सुमारे 10 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेनुसार, हे प्रक्षेपण भडकावू स्वरूपाचे असून ते संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या नियमांचे उल्लंघन ठरत आहे. KCNA च्या वृत्तानुसार, किम म्हणाले की हा सराव 420 किमी (260 मैल) अंतरातील शत्रूंना ‘अस्वस्थ’ करेल आणि त्यांना आपल्या स्ट्रॅटेजिक न्यूक्लिअर शस्त्रांची ताकद दाखवून देईल.

…तर शत्रू वाचणार नाही

किम जोंग ऊन यांचा इशारा कदाचित दक्षिण कोरिया आणि तेथे तैनात असलेल्या अमेरिकी सैन्याकडे होता. उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार किम म्हणाले की, ‘जर या शस्त्रांचा वापर झाला, तर त्यांच्या रेंजमध्ये येणाऱ्या शत्रूच्या लष्कराला बचाव करणे अशक्य असेल.’ दरम्यान, उत्तर कोरियाकडून अमेरिकेला ही उघड धमकी मानली जात आहे. त्यामुळे आता आगामी काळात संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल