AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रम्प यांना आजवरचा सर्वात मोठा धक्का, मित्र देशानेच दाखवला ठेंगा, साथ सोडल्याने अमेरिकेची बोबडीच वळली; आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या घडामोडी

Donald Trump in Tension : वेनेझुएलातील यशामुळे उत्साहित होऊन अमेरिका, इस्रायलला सोबत घेऊन इराणविरुद्ध युद्धाच्या मैदानात उतरला होता, मात्र आता डोनाल्ड ट्रम्प यांना सांकटाचा सामना करावा लागत आहे.

ट्रम्प यांना आजवरचा सर्वात मोठा धक्का, मित्र देशानेच दाखवला ठेंगा, साथ सोडल्याने अमेरिकेची बोबडीच वळली; आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या घडामोडी
Trump in Tension Image Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 15, 2026 | 9:07 PM
Share

अमेरिका आणि इराण यांच्यात भयंकर युद्ध सुरू आहे. मात्र आता या युद्धात अमेरिकेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेने इराणवर हल्ला करण्यापूर्वी ना नाटोशी संपर्क साधला, ना आपल्या जवळच्या मित्र ब्रिटनशी. वेनेझुएलामध्येही अशीच परिस्थिती झाली होती. वेनेझुएलातील यशामुळे उत्साहित होऊन अमेरिका, इस्रायलला सोबत घेऊन इराणविरुद्ध युद्धाच्या मैदानात उतरला. अमेरिकेला अपेक्षा होती की काही दिवसांतच इराण शरणागती पत्कारेल, मात्र अद्याप या युद्धात अमेरिकेला अपेक्षित यश मिळाले नाही.

डोनाल्ड ट्रम्प यांनी मागितली मदत

इराणने हार्मुसच्या सामुद्रधूनीतून जाणाऱ्या जहाजांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी सोशल मीडियाद्वारे सामुद्रधूनी खुली ठेवण्यासाठी विविध देशांनी आपापल्या युद्धनौका पाठवण्याचे आवाहन केले होते. चीन फ्रान्स, जपान, दक्षिण कोरिया, युनायटेड किंगडम हे देश होर्मुजवरील नाकेबंदी हटवण्यात मदत करतील, मात्र अद्याप कोणत्याही देशानी युद्धनौका पाठवण्यास तयारी दर्शविलेली नाही.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी ब्रिटनला स्पष्ट सांगितले होते की, ‘आता आम्हाला तुमची गरज नाही. एकेकाळी युनायटेड किंगडम आमचा महान सहकारी होता. पण आता मध्यपूर्वेत दोन विमानवाहू नौका पाठवण्याबाबत तो अजूनही विचार करत आहे. ते ठीक आहे, पण पंतप्रधान स्टारमर यांना मी सांगू इच्छितो की आता आम्हाला त्यांची गरज नाही. युद्ध जिंकल्यानंतर आमच्यासोबत येऊ इच्छिणाऱ्यांची आम्हाला आवश्यकता नाही.’ मात्र या विधानानंतर काहीच दिवसांनी ट्रम्प यांनी अनेक देशांकडे मदत मागितली आहे.

चीनचाही  नकार

डोनाल्ड ट्रम्प हे सध्या अनेक देशांकडे मदत मागत आहेत. ट्रम्प हे चीनला घेरण्याचा प्रयत्न करत होते, टॅरिफ युद्धाची सुरुवातही त्यांनी चीनपासूनच केली होती. मात्र आता ते चीनकडूनही अपेक्षा व्यक्त करत आहेत की तो इराणविरुद्ध आपली युद्धनौका पाठवेल. ट्रम्प यांना हेही माहीत आहे की इराण आणि चीन यांचे संबंध चांगले आहेत आणि चीन कधीही इराणविरुद्ध अमेरिकेची साथ देणार नाही. मात्र तरीही ते उघडपणे अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. कारण ट्रम्प यांना त्यांच्या स्वतःच्या सैन्याकडूनही साथ मिळालेली नाही. अमेरिकन नेव्ही होर्मुजमध्ये अडकलेल्या सर्व जहाजांना मार्ग दाखवेल असं ट्रम्प यांनी म्हटले होते, मात्र अमेरिकन सैन्याने सध्या ते शक्य नाही अशी माहिती दिली आहे. त्यामुळे आता ट्रम्प हे इतर देशांकडून अपेक्षा व्यक्त करत आहेत.

तुर्कीने अमेरिकेला दिला दणका

डोनाल्ड ट्रम्प यांनी मदतीसाठी अनेक देशांना मदतीसाठी आवाहन केले असले तरी कोणीही प्रतिसाद देताना दिसत नाही. नाटोमधील अमेरिकेचा मित्र असलेल्या तुर्कीनेही नेही या युद्धापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी सांगितले की, ‘तुर्की सर्व धोक्यांना सामोरे जाण्यास तयार आहे, पण इराणविषयक संघर्षात सहभागी होणे टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेत आहे. आमचे मुख्य काम म्हणजे आमच्या देशाचे संरक्षण करणे हे आहे.’ तुर्कीच्या या निर्णयामुळे ट्रम्प यांनी जबर हादरा बसला आहे.

Follow Us
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल