AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिसरं महायुद्ध झालं तर कोणता देश कोणासोबत? भारताचा कोणाला पाठिंबा? वाचा संपूर्ण यादी

जर तिसरं महायुद्ध झालं तर कोणता देश कोणासोबत असेल? भारत अशा स्थितीमध्ये कोणाला पाठिंबा देणार? असा प्रश्न या युद्ध काळात अनेकांना पडला आहे. याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

तिसरं महायुद्ध झालं तर कोणता देश कोणासोबत? भारताचा कोणाला पाठिंबा? वाचा संपूर्ण यादी
World War IIIImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 15, 2026 | 9:03 PM
Share

मध्य पूर्वेत सध्या भीषण युद्ध सुरू आहे. इस्त्रायल, अमेरिका आणि इराणमध्ये मोठा संघर्ष पहायला मिळत आहे. आज या युद्धाचा 16 दिवस आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर जबरदस्त हल्ले करण्यात येत आहेत. या युद्धात इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे इराणने देखील आपल्या मिसाईल हल्ल्यांनी इस्त्रायल आणि अमेरिकेची झोप उडवली आहे. यात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे इराणने या युद्धाच्या पार्श्वभूमीवर होर्मूज स्ट्रेट बंद केलं आहे. होर्मूज स्ट्रेट बंद केल्यामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये सध्या तीव्र इंधन टंचाई जाणवत आहे. जर ही परिस्थिती काही दिवस अशीच राहिली तर महायुद्धासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा अंदाज संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. दरम्यान संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मतानुसार कोणत्याही दोन देशांमध्ये किंवा काही ठराविक देशांमध्ये युद्ध झालं तर त्याला महायुद्ध म्हणता येणार नाही.

महायुद्ध कशाला म्हणतात?

संरक्षण क्षेत्रातील तज्त्रानुसार जर समजा जगभरात एकाचवेळी अनेक ठिकाणी युद्ध सुरू झालं. या युद्धाचं क्षेत्र हे काही देशांपुरत मर्यादीत न राहता ते खंडांमध्ये पसरलं तर त्याला महायुद्ध म्हणतात येईल. जर समजा महायुद्ध झालं तर कोणता देश कोणाच्या बाजूने असेल असा देखील अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो, चला तर मग आज या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात.

समजा जर तिसरं महायुद्ध सुरू झालं तर एका गटाचं नेतृत्व अमेरिका करेल ज्यामध्ये सगळे नाटो देश जसं की ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलिया यासारखे देश असतील. सध्या असलेली जागतिक व्यवस्था वाचवण्याच्या नावाखाली हा गट एकत्र येईल. या गटाला तैवान आणि युक्रेन सारख्या देशांचं देखील समर्थन मिळू शकतं. तर दुसरा जो गट आहे, तो गट रशिया आणि चीनच्या नेतृत्वाखाली एकत्र येईल त्यामध्ये उत्तर कोरिया, इराण, बेलारूस या सारख्या देशांचा समावेश असेल. सीरिया, व्हेनेझुएला या सारख्या देशांचा या गटाला पाठिंबा मिळू शकतो.

भारताची भूमिका काय?

तिसऱ्या महायुद्धामध्ये भारताची भूमिका ही खूप जटिल असू शकते. भारताला वाइल्डकार्ड प्लेयर मानलं जातं. भारताचे रशियासोबत जुने संबंध आहेत. रशिया हा भारताचा सर्वात जवळचा मित्र आहे. त्यामुळे अशा अवस्थेमध्ये भारत रशियाला पाठिंबा देऊ शकते. मात्र दुसरीकडे भारताचा चीनसोबत संघर्ष आहे. अशा परिस्थितीमध्ये भारत काही कठोर निर्णय देखील घेऊ शकतो.

Follow Us
वंचितला पाठिंबा द्यायचा की नाही? काँग्रेसच्या भूमिकेविषयी मोठी माहिती
Amravati | वंचितला पाठिंबा द्यायचा की नाही? काँग्रेसच्या भूमिकेविषयी सर्वात मोठी माहिती; अमरावतीत नेमकं काय घडतंय?
भीमशंकर देवस्थानाबाबत मोठा निर्णय! आता VIP दर्शन बंद; नवा नियम नेमका
भीमशंकर देवस्थानाबाबत मोठा निर्णय! आता VIP दर्शन बंद; नवा नियम नेमका काय?
मद्यधुंद तरुणाच्या भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक!
Pune Hinjewadi | हिंजवडीत ड्रंक अँड ड्राइव्हचा कहर; मद्यधुंद तरुणाच्या भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक!
कॉंग्रेसमध्ये मोठं भगदड! शिंदेच्या पक्षातील इनकमिंग सुरुच, 10 नगरसेवाक
कॉंग्रेसमध्ये मोठं भगदड! शिंदेच्या पक्षातील इनकमिंग सुरुच, 10 नगरसेवाकांसह...
नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्र शासनाचा मोठा निर्णय! पुनर्परीक्षा काही दिव
NEET Paper Leak | नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्र शासनाचा मोठा निर्णय! पुनर्परीक्षा काही दिवसांवरच आली असता...
काँग्रेसमध्ये मोठं बंड? सपकाळ यांच्या हटवणीसाठी दिल्लीत मोर्चेबांधणी
Harshwardhan Sapkal | काँग्रेसमध्ये मोठं बंड? हर्षवर्धन सपकाळ यांच्या हटवणीसाठी थेट दिल्लीत मोर्चेबांधणी
पवनराजे निंबाळकर केसच्या सुनावणीत असं काय घडलं? ओमराजे...
पवनराजे निंबाळकर केसच्या सुनावणीत असं काय घडलं? ओमराजे निंबाळकर स्पष्टच बोलले...
शरद पवारांना मोठा धक्का? राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल
Nagpur | शरद पवारांना मोठा धक्का? राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल; भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा!
अशा लोकांमुळे पंढरपूर अशुद्ध झाले... रोहित पवारांच्या आंदोलनानंतर भाजप
अशा लोकांमुळे पंढरपूर अशुद्ध झाले... रोहित पवारांच्या आंदोलनानंतर भाजप नेत्याची जोरदार टीका
रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडलं; सक्षणा सलगर आक्रमक
Sakshana Salgar | रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडलं; सक्षणा सलगर आक्रमक, पंढरपुरात पेटला नवा राजकीय वाद!