डोनाल्ड ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. तसेच ते एक यशस्वी अमेरिकन उद्योजक देखील आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा जन्म 4 जून 1946 रोजी न्यूयॉर्क शहरातील क्वीन्स या भागात झाला. त्यांच्या वडिलांचा व्यवसाय रियल इस्टेटमध्ये होता. वयाच्या 13 व्या वर्षी ट्रम्प मिलिटरी स्कूलमध्ये शिकण्यासाठी गेले. त्यानंतर 1964 मध्ये त्यांनी मिलिटरी अॅकेडमीमधून पदवी घेतली. 1970 च्या दशकातच ट्रम्प यांनी तोट्यातील कमोडोर हॉटेलला 7 कोटी डॉलर्समध्ये विकत घेतले आणि 1980 मध्ये तेच हॉटेल 'हॉटेल द ग्रँड हयात' या नावाने सुरू केले. 1982 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यूयॉर्कमध्ये ट्रम्प टॉवर बांधला, जो न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध इमारतींपैकी एक आहे. 1999 मध्ये ट्रम्प यांनी राजकारणातही प्रवेश केला आणि रिफॉर्म पार्टी स्थापन केली. पण त्यावेळी ते राष्ट्रपती म्हणऊन निवडून येऊ शकले नाहीत. त्यानंतर, 19 जुलै 2016 रोजी ट्रम्प यांना अमेरिकेची ग्रँड ओल्ड पार्टी, रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून निवडले गेले. ट्रम्प हे अमेरिकेचे सर्वात वयस्क राष्ट्रपती ठरले आहेत. वयाच्या 78व्या वर्षी ते दुसऱ्यांदा राष्ट्रपती बनले आहेत. विशेष म्हणजे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले ट्रम्प हे अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती आहेत.
Read MoreIndia-US : रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या भारताने अमेरिकेला सुद्धा दिला तितकाच बिझनेस, तक्रारीला संधी मिळणार नाही केलं असं काम
India-US : भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून अमेरिकेचा तक्रारीचा सूर असतो. पण आता डोनाल्ड ट्रम्प यांना तक्रारीला वाव मिळणार नाही असं काम भारताने केलं आहे. रशियाकडून तेल खरेदी करतो, तर भारताने अमेरिकेला सुद्धा बिझनेस दिला आहे.
- Dinananth Parab
- Updated on: Sep 27, 2026
- 9:52 am
भारतावर 100 टक्के टॅरिफ लागणार का? अमेरिकेनेच्या नव्या भूमिकेमुळे जग चकित; व्यापाराचं काय होणार?
भारतावर 100 टक्के टॅरिफ कधी लागू केला जाणार, असा प्रश्न विचारण्यात आला असता अमेरिकन अधिकाऱ्याने हा अधिकार मिळाला असला तरी टॅरिफ दुसऱ्याच दिवशी लागू होईल असे नाही, असे स्पष्ट केले.
- Prajwal Dhage
- Updated on: Sep 26, 2026
- 6:57 pm
हौथींकडून मिसाइल-ड्रोन हल्ला; सौदीच्या मदतीला कोण येणार? अमेरिका मागे हटली, पाकिस्तानकडून धोका; पण फ्रान्सचा मोठा निर्णय
France Saudi Deal: हौथींकडून होणाऱ्या सततच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर फ्रान्सने सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे.
- Vrushal Karmarkar
- Updated on: Sep 25, 2026
- 8:21 pm
मोठी बातमी! शी जिनपिंग दौऱ्यावर असतानाच भारताचा अमेरिकेला सर्वात मोठा दणका, डोनाल्ड ट्रम्प हात चोळत बसले
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचं अमेरिकेमध्ये भव्य स्वागत करण्यात आलं आहे. परंतु दुसरीकडे चीनचे राष्ट्रपती अमेरिकेच्या दौऱ्यावर असतानाच भारताने ट्रम्प यांना मोठा दणका दिला आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Sep 24, 2026
- 9:48 pm
माझ्या मित्राशी पंगा घेऊ नका… ट्रम्प यांचा गल्फ नेत्यांना थेट इशारा, खास मित्र कोण?
न्यूयॉर्कमधील मध्य पूर्वेतील नेत्यांसोबतच्या बैठकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी तुर्कीचे राष्ट्रपती एर्दोगन यांची प्रचंड स्तुती केली. एर्दोगनना 'टफ कुकी' आणि 'मित्र' संबोधत ट्रम्प यांनी इतरांना त्यांच्याशी वैर न करण्याचा इशारा दिला. या अप्रत्याशित मैत्रीची जगभर चर्चा सुरू असून, यामुळे मध्य पूर्वेतील राजकारण आणि अमेरिका-तुर्की संबंधांना नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे.
- भीमराव गवळी
- Updated on: Sep 23, 2026
- 11:18 am
US Tariff : रशियाचं कारण फक्त नावाला, अमेरिका भारतावर इतक्या मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावतेय त्यामागे त्याच्या मनात फक्त एकच भिती
US Tariff : भारत रशियाकडून तेल खरेदी करतो. त्यामुळे रशियाला आर्थिक फायदा होऊन त्यांना युक्रेन विरोधात लढण्यासाठी बळ मिळतं एवढाच एक हेतू हा कायदा आणण्यामागे आहे का?. टॅरिफ म्हणून अमेरिका लावतेय का? जाणून घ्या त्या मागचं खरं कारणं.
- Dinananth Parab
- Updated on: Sep 22, 2026
- 4:43 pm
ट्रम्प यांचा मोठा पराभव..? मध्यावधी निवडणुकीपूर्वीच झटका; सर्व्हेचे धक्कादायक आकडे समोर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मध्यावधी निवडणुकीपूर्वी मोठा धक्का बसला आहे. एका नव्या सर्वेक्षणानुसार, ट्रम्प यांची लोकप्रियता लक्षणीयरीत्या घटली आहे. इराणसोबतचा संघर्ष आणि अमेरिकेची अर्थव्यवस्था या प्रमुख चिंतांमुळे अनेक मतदार त्यांच्या विरोधात आहेत. हे आकडे ट्रम्प यांच्या संभाव्य पराभवाकडे निर्देश करत आहेत.
- भीमराव गवळी
- Updated on: Sep 22, 2026
- 2:50 pm
US White House : व्हाइट हाऊसकडून CNN वर बंदी, मोठ्या टीव्ही नेटवर्क्सनी रोखलं प्रेसिडेंट ट्रम्प यांचं कवरेज
US White House : अमेरिकेच्या तीन मोठ्या मीडिया समूहांनी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकी प्रशासनाच्या अनेक टॉप अधिकाऱ्यांविरोधात खटला दाखल केला आहे. तिन्ही समूहाच्या पत्रकारांनी शनिवारी 19 सप्टेंबरला व्हाइट हाऊसमध्ये प्रवेशाचा प्रयत्न केला होता.
- Dinananth Parab
- Updated on: Sep 22, 2026
- 8:33 am
Pakistan: पाकिस्तानची वाट लागणार, हुती बंडखोर हल्ला करणार? थेट धमकीने उडाली घाबरगुंडी
Yemen Houthis warns Pakistan:आता आखातामधील युद्धाची झळ भारताच्या शेजारील पाकिस्तानला बसण्याची शक्यता आहे. शिया बंडखोर हुतींनी पाकिस्तानवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. यामुळे इस्लामाबादमध्ये हालचाली वाढल्या आहेत.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Sep 20, 2026
- 8:55 am
डोनाल्ड ट्रम्प यांचं काय होणार? मिड-टर्म निवडणुकीसाठी मतदान सुरू; नोव्हेंबरमध्येच…
अमेरिकेत मिडटर्म निवडणुकांसाठी मतदान सुरू झाले असून, हे ट्रम्प यांच्या राजकीय भविष्यासाठी महत्त्वाचे आहे. काँग्रेस, गव्हर्नर आणि स्टेट लेजिस्लेचरसाठी होणाऱ्या या निवडणुकीत महागाई, इराण संघर्ष आणि इमिग्रेशनसारखे मुद्दे निर्णायक ठरत आहेत. रिपब्लिकन बहुमत कायम राखणार की ट्रम्प यांना धक्का बसणार, हे नोव्हेंबरमध्ये स्पष्ट होईल.
- भीमराव गवळी
- Updated on: Sep 18, 2026
- 3:32 pm
Iran: युद्ध सुरू असतानाच इराणचे राष्ट्राध्यक्ष लवकरच अमेरिकेत, जगही बुचकाळ्यात, मोठी अपडेट काय?
Iran-America Update: मध्य-पूर्वेत युद्ध संघर्ष पेटला आहे. हुती आणि सौदी अरबमध्ये युद्धाचा भडका उडला आहे. तर इराण आणि अमेरिकेतही संघर्ष वाढला आहे. त्यातच इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची हे अमेरिकेच्या दौऱ्यावर जात असल्याने जगही बुचकाळ्यात पडले आहे. काय आहे अपडेट?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Sep 18, 2026
- 9:24 am
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मोठा निर्णय! 100% टॅरिफला भारताचा थेट इशारा, गरज पडली तर…
अमेरिकेच्या 100 टक्के टॅरिफच्या प्रकरणावर भारताने कठोर प्रतिक्रिया दिली आहे. आता परराष्ट्र मंत्रालयाने नेमका काय निर्णय घेतला आहे? जाणून घ्या...
- आरती बोराडे
- Updated on: Sep 17, 2026
- 11:03 am