AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Trade Deal : भारतासाठी खुशखबर ! व्हाईट हाऊसकडून फॅक्ट शीटमध्ये बदल, डाळींबद्दल मोठा निर्णय..

India-US Trade Deal factsheet : अमेरिकेने भारतासोबतच्या व्यापार फॅक्ट शीटमध्ये काही बदल केला आहे. हे बदल भारतासाठी अतिशय फायदेशीर आहेत. जे बदल करण्यात आले आहेत, त्याच मुद्यावरून काँग्रेसने सरकारवर निशाणा साधला होता, मात्र आता हे बदल झाल्याने भारतासाठी खुशखबरी आहे. असे काय झाले आहेत बदल ? जाणून घेऊया सविस्तर

Trade Deal : भारतासाठी खुशखबर ! व्हाईट हाऊसकडून फॅक्ट शीटमध्ये बदल, डाळींबद्दल मोठा निर्णय..
भारत-अमेरिका ट्रेड डील
| Updated on: Feb 11, 2026 | 11:38 AM
Share

India-US Trade Deal : भारत-अमेरिका ट्रेड डीलमध्ये एक नवी, मोठी अपडेट आली आहे. अमेरिकेने भारतासोबतच्या व्यापार कराराच्या फॅक्ट शीटमध्ये मोठा बदल केला आहे. या बदलामुळे भारताला मोठा फायदा होणार आहे. व्हाईट हाऊसच्या फॅक्ट शीटनुसार, आता ट्रेड डीलच्या लिस्टमधून डाळी काढून टाकण्यात आल्या आहेत. गेल्या आठवड्यात, भारत आणि अमेरिकेने अंतरिम व्यापार कराराची घोषणा केली. त्यावेळी, व्हाईट हाऊसने एक फॅक्टशीट जारी केली होती, ज्यामध्ये काही मु्द्यांचा समावेश होता, जे भारतासाठी चिंताजनक ठरू शकले असते. त्यावरून अनेक सवालही उपस्थित झाले. मात्र आता अमेरिकेने ही फॅक्टशीट अपडेट केली आहे. समाविष्ट होते जे भारतासाठी काही चिंता निर्माण करू शकतात. यामुळे प्रश्न निर्माण झाले आहेत.

ट्रेड डीलच्या फॅक्टशीटमधून अनेक गोष्टी हटवण्यात आल्या आहेत किंवा शब्द बदलण्यात आले आहेत. त्यातील सर्वात महत्वाती म्हणजे डाळ. हो, भारतासाठी सर्वात मोठी चांगली बातमी, म्हणजे डाळींचा उल्लेख पूर्णपणे काढून टाकण्यात आला आहे. यापूर्वी फॅक्टशीटमध्ये असे स्पष्टपणे नमूद करण्यात आलं होतं की भारत अमेरिकन डाळींवरील शुल्क कमी करेल किंवा काढून टाकेल. मात्र आता, त्या यादीतून ‘certain pulses’ म्हणजेच ‘काही डाळी’ हे शब्द काढून टाकण्यात आले आहेत. याचाच अर्थ असा की भारताला आता अमेरिकन डाळींवरील शुल्क कमी करण्याची गरज नाही. भारतीय शेतकरी आणि डाळी उत्पादकांसाठी ही खूप चांगली बातमी आहे.

पहिला मोठा बदल डाळींचा

खरं तर, काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून चर्चा झाली. त्यानंतर, अमेरिका आणि भारत यांची एका ट्रेड डीलवर सहमती झाली. त्यानंतर एक फॅक्टशीट जारी करण्यात आली. व्हाईट हाऊसने आता भारतासोबतच्या व्यापार कराराच्या फॅक्टशीटमध्ये थोडीशी सुधारणा केली आहे. मागील फॅक्टशीटमधील काही मजकूर काढून टाकण्यात आला आहे तसेच काही शब्दरचना देखील बदलण्यात आली आहे. यातील सर्वात पहिला, सर्वात मोठा बदल म्हणजे डाळींबद्दल आहे.

दुसरा मोठा बदल काय ?

त्यातील दुसरा मोठा बदल म्हणजे 500 अब्ज डॉलर्सच्या खरेदीचे आश्वासन. भारत-अमेरिका व्यापार कराराच्या फॅक्टशीटमध्ये आधी असं म्हटलं होतं की, भारत हा अमेरिकेकडून 500 अब्ज डॉलर्सच्या वस्तू खरेदी करण्यास वचनबद्ध म्हणजेच ‘committed’ आहे, म्हणजेच त्यांनी ते वचन दिलं आहे. मात्र आता हा शब्द बदलून ‘intend’ करण्यात आला आहे, याचा अर्थ त्यांचा असा विचार किंवा मानस आहे. म्हणजेच भारताने कोणतेही आश्वासन दिलेलं नाही, उलट हा एक हेतू आहे. करारानुसार हेतू बदलू शकतात, परंतु आश्वासने बदलत नाहीत.

याव्यतिरिक्त, “कृषी उत्पादने” हेही खरेदी यादीतून काढून टाकण्यात आली आहेत. आता, फक्त ऊर्जा, आयसीटी, कोळसा आणि इतर उत्पादनांचा उल्लेख आहे. याचा अर्थ कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी कोणताही दबाव नाही. सुधारित आवृत्तीमध्ये या लिस्टमधून कृषी उत्पादनांचा उल्लेख काढून टाकण्यात आला आहे.

Follow Us
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच