AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Explainer : इराणने कितीही बढाया मारल्या तरी अमेरिकेसमोर टिकू शकणार नाही, एकदा US ची सैन्य शक्ती जाणून घ्या..

अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांदरम्यान सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. करार करा किंवा परिणाम भोगा असा इशाराच अमेरिकेनं इराणला दिला आहे. या दोन्ही देशांपैकी कोणाचं सैन्य अधिक शक्तीशाली आहे, या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात..

Explainer : इराणने कितीही बढाया मारल्या तरी अमेरिकेसमोर टिकू शकणार नाही, एकदा US ची सैन्य शक्ती जाणून घ्या..
कोणत्या देशाकडे किती लाख सैन्य?Image Credit source: AP
| Updated on: Feb 13, 2026 | 3:35 PM
Share

America Vs Iran Army: इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणमधील सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांच्याविरोधात तिथले नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. या आंदोलनांनंतर तेहरान आणि वॉशिंग्टन यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला वारंवार धमकी दिली आहे. इतकंच नव्हे तर अमेरिकेनं इराणजवळ त्यांचं सर्वांत घातक युद्धनौका तैनात केलं होतं. त्यामुळे अमेरिका इराणवर हल्ला करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दोन्ही देश एकमेकांना थेट धमक्या देत आहेत. अशातच अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधील लष्कराची तुलना हा अनेकांच्या कुतुहलाचा विषय ठरला आहे. अमेरिका ही जगातील महासत्ता मानली जाते. तर इराण हे मध्य पूर्वेतील एक प्रमुख शक्ती आहे. या दोन्ही देशांची लष्करी संसाधनं, विचार, युद्ध धोरणं ही खूप वेगळी आहेत.

संरक्षण बजेट

अमेरिका आणि इराणमधील सर्वांत मोठा फरक म्हणजे त्यांचं संरक्षण बजेट. अमेरिका दरवर्षी त्यांच्या लष्करावर अंदाजे 850 ते 900 अब्ज डॉलर खर्च करते. हा जगाच्या एकूण लष्करी खर्चाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या तुलनेत इराणचं संरक्षण बजेट हे अंदाजे 15 ते 25 अब्ज डॉलर इतकं आहे. दोन्ही देशांच्या संरक्षण बजेटमध्ये हा खूप मोठा फरक आहे. आकड्यातून ते सहज स्पष्ट होत आहे. या महत्त्वपूर्ण फरकामुळे अमेरिकेला अत्याधुनिक शस्त्रे, नवीन तंत्रज्ञान आणि जागतिक लष्करी तळांमध्ये गुंतवणूक अशा सुविधा मिळतात. तर इराण मर्यादित संसाधनांमध्ये आपली रणनिती आखतो.

लष्करी ताकद

लष्करी ताकदीबद्दल बोलायचं झाल्यास, अमेरिकेकडे अंदाजे 1.3 दशलक्ष सक्रिय सैन्य आहे. राखीव आणि नॅशनल गार्डची संख्या समाविष्ट केल्यास हा आकडा दोन दशलक्षांपेक्षा जास्त होतो. तर दुसरीकडे इराणकडे अंदाजे 6,00,000 सक्रिय सैन्य आहे. यामध्ये इराणी आर्मी आणि रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) यांचा समावेश आहे. इराणमध्ये बासीजसारखे निमलष्करी दलदेखील आहेत, जे संकटकाळी मोठ्या संख्येने तैनात केले जाऊ शकतात.

दोन्ही देशांच्या सैन्याची तुलना

अमेरिकन सैन्यात अत्याधुनिक टँक, चिलखती वाहनं आणि अचूक शस्त्र प्रणाली आहे. त्यांच्याकडे हजारो आधुनिक टँक आणि स्वयंचलित तोफखाना आहेत. तर इराणचं सैन्य संख्यात्मकदृष्ट्या मजबूत आहे. परंतु तंत्रज्ञानाच्या बाबतीत ते अमेरिकेच्या तुलनेत खूप जुनं मानलं जातं. संरक्षणात्मक रणनिती आणि भौगोलिक समजूत ही इराणची अस्सल ताकद आहे.

हवाई दल

एअरफोर्स शक्तीमध्ये अमेरिकेचा वरचष्मा स्पष्ट दिसून येतो. त्यांच्याकडे 13,000 हून अधिक लष्करी विमानं आहेत, ज्यामध्ये F-35 आणि F-22 यांसारख्या गुप्त लढाऊ विमानांचा समावेश आहे. तर इराणकडे अंदाजे 400 ते 600 विमानं आहेत. त्यापैकी बरेच जुने मॉडेल्स आहेत. गेल्या काही वर्षांत इराणने ड्रोन तंत्रज्ञानावर अधिक भर दिला आहे. त्यामुळे हा त्यांच्या एअरफोर्स धोरणाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.

नौदल

अमेरिकन नौदल ही जगातील सर्वांत शक्तिशाली नौदल मानलं जातं. अमेरिकाकडे 11 हून अधिक विमानवाहू जहाजं (एअरक्राफ्ट कॅरिअर), आण्विक पाणबुड्या आणि शेकडो युद्धनौका आहेत. या सर्वांची पोहोच जागतिक पातळीवर आहे. याउलट इराणचं नौदल प्रामुख्याने पर्शियन आखात आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीपुरतं मर्यादित आहे. इराणची रणनिती ही मोठ्या संघर्षांऐवजी लहान पण जलद हल्ल्यांवर आधारित आहे.

अमेरिका आणि इराणच्या सैन्याची ताकद

अमेरिका इराण
संरक्षण बजेट- 850-900 अब्ज डॉलर संरक्षण बजेट- 15 ते 25 अब्ज डॉलर
13 लाख सक्रिय सैनिक 6 लाख सक्रिय सैनिक
11 हून अधिक एअरक्राफ्ट कॅरियर शून्य एअरक्राफ्ट कॅरियर
13,000 हून अधिक विमानं 400 ते 600 विमानं
25,000 हून अधिक मिसाइल क्षमता 3000 हून अधिक मिसाइल क्षमता
70 हून अधिक पाणबुड्या 28 ते 30 पाणबुड्या
5000 हून अधिक अण्वस्त्र शून्य अण्वस्त्र

क्षेपणास्त्रांची क्षमता

संरक्षण बजेट, सैनिकांची संख्या, पाणबुड्या, एअरक्राफ्ट कॅरियर, अण्वस्त्र या सर्वांच्या बाबतीत अमेरिका जरी वरचढ ठरत असली तरी इराणची खरी ताकद ही त्यांच्या क्षेपणास्त्र क्षमतेत आहे. इराणकडे हजारोंच्या संख्येनं कमी आणि मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आहेत, जी मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या तळांना धोका निर्माण करू शकतात. अमेरिकेकडेदेखील क्रूझ आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आहेत, ज्यांचा पल्ला आणि अचूकता अधिक आहे. अमेरिकेच्या क्षेपणास्त्र प्रणाली जागतिक स्तरावर कार्य करण्यास सक्षम आहेत.

ड्रोन

कमी किंमतीत प्रभावी ड्रोन हे इराणच्या लष्करी रणनितीचा प्रमुख घटक आहे. इराणने ड्रोन युद्धात अद्वितीय कौशल्य विकसित केलं आहे. शिवाय प्रॉक्सी गटांचा वापर करून आणि मर्यादित हल्ल्यांचा वापर करून ते अप्रत्यक्ष युद्ध रणनिती वापरतात. याउलट अमेरिकेची रणनिती ही थेट आणि तंत्रज्ञानावर आधारित आहे.

जागतिक पोहोच

अमेरिकेची लष्करी पोहोच युरोप, आशिया आणि मध्य पूर्वेत पसरलेली आहे. त्याला नाटोसारख्या शक्तिशाली लष्करी आघाडीचा पाठिंबा आहे. इराणची पोहोच मात्र मुख्यत्वे मध्य पूर्वेपुरतीच मर्यादित आहे. परंतु तिथे इराणचा प्रभाव खोलवर आहे. त्यामुळे प्रादेशिक पोहोचच्या बाबतीत इराण महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

या दोन्ही देशांच्या रणनितीचा विचार केला तर अमेरिका आपली शक्ती दाखवण्याबाबत वरचढ ठरते. तर इराण हा प्रतिबंध, शत्रूला युद्धापासून परावृत्त करणं आणि नुकसान पोहोचवण्याची क्षमता दाखवणं यावर अधिक भर देतो. या दोन्ही देशांचे विचार आणि उद्दिष्टे पूर्णपणे वेगळी आहेत.

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...