AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

American Tariff : अमेरिका भारतावर शून्य टक्के टॅरिफ लावणार, ट्रम्प यांचा मोठा निर्णय, पण ठेवली ही सर्वात अवघड अट

अमेरिका आणि भारतामध्ये ट्रेड डील झाली आहे, या ट्रेड डीलनंतर एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे अमेरिका भारतावर शून्य टक्के टॅरिफ लावण्यास तयार आहे, मात्र त्यासाठी एक मोठी अट ठेवण्यात आली आहे.

American Tariff : अमेरिका भारतावर शून्य टक्के टॅरिफ लावणार, ट्रम्प यांचा मोठा निर्णय, पण ठेवली ही सर्वात अवघड अट
Donald Trump (Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 13, 2026 | 3:00 PM
Share

अमेरिका आणि भारतामध्ये एक मोठी व्यापारी डील झाली आहे. या ट्रेड डीलचा दोन्ही देशांना देखील मोठा फायदा होणार आहे. अमेरिका आणि भारतामध्ये ट्रेड डील होताच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषण केली. अमेरिकेनं भारतावर असलेला टॅरिफ कमी केला आहे. सुरुवातीला भारतावर अमेरिकेनं 50 टक्के टॅरिफ लावला होता. तो आता 18 टक्के करण्यात आला आहे. आता मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे जशी बंग्लादेशला टॅरिफमध्ये अमेरिकेकडून सूट मिळाली तशी भारताला देखील मिळण्याची शक्यता आहे, मात्र त्यासाठी अमेरिकेकडून एक अट ठेवण्यात आली आहे, या अटीची पूर्तता केली तरच भारताला टॅरिफ संदर्भातील लाभ मिळू शकतो. याबाबत वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी माहिती दिली आहे.

पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे की, अमेरिकेसोबत झालेल्या ट्रेड डीलनुसार सध्या टॅरिफमध्ये बग्लादेशला जी सूट मिळत आहे, तशीच सूट भारताला देखील मिळणार आहे. अमेरिकेनं बाग्लादेशमधून निर्यात होणाऱ्या कापडांवर शून्य टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हे तेव्हाच शक्य होणार आहे, जेव्हा त्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे कापूस आणि इतर कृत्रिम धागे हे अमेरिकेमधून खरेदी केले जाणार आहेत, आणि त्यापासून जे कापड तयार केलं जाईल, त्यावर अमेरिकेत शून्य टक्के टॅरिफ लावला जाणार आहे.

पुढे बोलताना पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे की, या ट्रेड डीलनंतर आता बांग्लादेशला जो फायदा मिळणार आहे तसाच फायदा हा भारताला देखील मिळू शकतो. जर एखादी भारतीय कंपनी अमेरिकेमध्ये उत्पादीत होणाऱ्या कापसापासून कापड बनवत असेल आणि ते जर अमेरिकेत निर्यात केलं तर त्या कापडांवर शून्य टक्के टॅरिफ लावला जाणार आहे. दरम्यान अमेरिकेच्या या अटीचा भारतीय शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  यामुळे भारतामधील कापूस उत्पादन शेतकरी संकटात सापडू शकतात. कापूस उत्पादक शेतकरी आधीच अनेक संकटांना तोंड देतोय, त्यामध्ये आता हे नवं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत