AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran vs US : फक्त न्यूक्लियर बॉम्ब नाही, अजून एका कारणासाठी इराण-अमेरिका युद्ध अटळ, US आर्मी फक्त एका ऑर्डरसाठी थांबलीय

Iran vs US : इराण आणि अमेरिकेमध्ये मध्यस्थी घडवून आणण्याचे आखातामधील देशांचे प्रयत्न सुरु आहेत. कारण युद्धाला तोंड फुटलं, तर त्यांना त्याची झळ सोसावी लागेल. पण इराण-अमेरिका युद्ध अटळ वाटतय. यामागे दोन प्रमुख कारणं आहेत.

Iran vs US : फक्त न्यूक्लियर बॉम्ब नाही, अजून एका कारणासाठी इराण-अमेरिका युद्ध अटळ, US आर्मी फक्त एका ऑर्डरसाठी थांबलीय
Us iran Middle east tensionImage Credit source: Mass Communication Specialist 2nd Class Ridge Leoni/U.S. Navy via Getty Images
| Updated on: Feb 14, 2026 | 2:00 PM
Share

इराण आणि अमेरिकेमध्ये तणाव कमी होत नाहीय. ओमानमधील चर्चेनंतरही युद्धाचा धोका टळलेला नाहीय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी जाहीर केलं की, दुसरा एअरक्राफ्ट कॅरिअर ग्रुप लवकरच मिडिल ईस्टला रवाना होईल. त्यामुळे एकाबाजूला इराण-अमेरिकेमध्ये चर्चेची शक्यता वाटत असली, तरी युद्धाचा धोका सुद्धा कायम आहे. जेव्हा पत्रकारांनी ट्रम्प यांना विचारलं की, USS गेराल्ड आर.फोर्डला कॅरेबियन समुद्रातून मिडिल ईस्टला घेऊन जाणार का?. त्यावर त्यांनी ‘लवकरच तिथे जायला निघेल’ असं उत्तर दिलं. ‘जर आमची डील झाली नाही, तर आम्हाला त्याची गरज भासेल’ असं ट्रम्प म्हणाले.

द न्यूयॉर्क टाइम्सने आधीच बातमी दिलेली की, फोर्ड स्ट्राइक ग्रुपला नवीन ऑर्डर मिळालीय. त्यानुसार फारसच्या खाडीत USS अब्राहम लिंकन कॅरियर स्ट्राइक ग्रुपला फोर्ड स्ट्राइक ग्रुप जॉईन करेल. इराणवर दबाव वाढवण्याच्या रणनितीचा हा भाग म्हणून त्याकडे पाहिलं जात आहे. ट्रम्प यांनी या आठवड्याच्या सुरुवातीलाच संकेत दिले होते की, त्यांना इराण जवळच्या समुद्रात दुसरी विमानवाहू युद्धनौका पाठवायची आहे. ही युद्धनौका कुठली, या बद्दल त्यांनी तसचं अमेरिकन नौदलाकडूनही काहीच सांगण्यात आलं नव्हतं. ताज्या निर्णयांवरुन असं दिसतय की, ओमानची चर्चा फेल झाली, तर इराणवर हल्ला होऊ शकतो.

असा इशारा अमेरिकेने आधीच दिलाय

इराणने मागच्या महिन्यात बळाचा वापर करुन प्रदर्शनं, आंदोलनं मोडून काढली. त्यानंतर अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढला. या प्रदर्शनात हजारो लोक मारगे गेल्याचा अमेरिकेचा दावा आहे. इराणचा दावा आहे की, या आंदोलनामागे इस्रायल आणि अमेरिकेचा हात आहे. इराणने त्यांच्या अणवस्त्र कार्यक्रमासंदर्भात डील केली नाही, तर चर्चा अपयशी ठरली तर गंभीर परिणाम होतील असा इशारा अमेरिकेने आधीच दिला आहे.

युद्ध अटळ का?

USS अब्राहम लिंकन ही विमानवाहू युद्धनौका आणि गायडेड-मिसाइल डिस्ट्रॉयर आधीपासूनच अरबी समुद्रात तैनात आहेत. मागच्या आठवड्यात US नौदलाने एक ईराणी ड्रोन पाडलं, जे युद्धनौकेच्या जवळ आलं होतं. इराण झुकण्याचे संकेत देत नाहीय. अमेरिका-इराण युद्ध अटळ यासाठी आहे कारण फक्त अणवस्त्र प्रकल्पच नाहीत, तर इराणचा बॅलेस्टिक मिसाइल प्रोग्रॅम सुद्धा एक कारण आहे. कारण इस्रायल या मिसाइलच्या रेंजमध्ये येतो. जून महिन्यात इराण-इस्रायल युद्धात इराणच्या अनेक मिसाइल्समुळे इस्रयालमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली होती. त्यामुळे इराणने त्यांचा बॅलेस्टिक मिसाइल कार्यक्रम बंद करावा ही अमेरिका-इस्रायलची प्रमुख मागणी आहे. इराण या समोर झुकेल असं वाटत नाही.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात