Robert Pattinson: लग्न न करताच जेम्स बाँड झाला बाप! रॉबर्ट पॅटिन्सनची गर्लफ्रेंड कोण? जगभरातील तरुणींमध्ये का इतकी चर्चा?
James Bond Robert Pattinson Girlfriend: हॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता रॉबर्ट पॅटिन्सन हा लग्न न करताच बाप झाला आहे. त्याच्या आयुष्यातील या बातमीने सिनेउद्योगात खळबळ उडाली आहे. तर जगभरातील तरुणी या बातमीने हळहळल्या आहेत. कोण आहे त्याची गर्लफ्रेंड?

James Bond Robert Pattinson Girlfriend: हॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता रॉबर्ट पॅटिन्सन याच्या करिअरमध्ये एक वेगळे वलण आले आहे. ट्रायलाईट आणि द बॅटमॅन या त्याच्या सिनेमांनी जगभरात धुमाकूळ घातला. आता तो जगप्रसिद्ध गुप्तहेर अर्थातच जेम्स बाँडच्या (James Bond) भूमिकेत दिसणार आहे. डॅनियल क्रेगनंतर जगासमोर नवा कोरा करकरीत 007 म्हणून रॉबर्ट येत आहे. त्याच्यावर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याचवेळी त्याच्या खासगी आयुष्यातही मोठे वळण आले आहे. त्याची सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. कोण आहे त्याची गर्लफ्रेंड?
कोण आहे रॉबर्ट पॅटिन्सनची गर्लफ्रेंड?
रॉबर्ट पॅटिन्सन हा गेल्या अनेक वर्षांपासून ब्रिटिश गायिका, अभिनेत्री आणि मॉडेल सुकी वॉटरहाऊस (Suki Waterhouse) हिला डेट करत आहे. 34 वर्षीय सुकीचा जन्म पश्चिम लंडनमध्ये झाला आहे. तिने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली आहे. तिने बरबरी, टॉमी हिलफिगर आणि ह्युगो बॉस या सारख्या जागतिक फॅशन ब्रँडसाठी काम केले आहे. मॉडेलिंग सोबतच सुकीने लव्ह, रोझी, इनसर्जेंट आणि डिटेक्टिव्ह पिकाचून यासारख्या चित्रपटातून तिने कसदार अभिनय केला आहे. ती एक यशस्वी इंडी-पॉप गायिका आहे. टेलर स्विफ्टच्या एरास दूरमध्येही तिने कामगिरी बजावली आहे.
लग्नाआधीच आई-बाबा
रॉबर्ट आणि सुकी यांची पहिली भेट 2018 मध्ये लॉस एंजेलिसमधील एका गेम नाईट दरम्यान झाली होती. जुलै 2018 मध्ये त्यांचे रोमँटिक फोटो व्हायरल झाले. त्यानंतर त्यांच्या नात्याची जोरदार चर्चा रंगली. अनेक वर्ष एकत्र राहिल्यानंतर या जोडप्याने डिसेंबर 2023 मध्ये साखरपुडा केला. मार्च 2024 मध्ये सुकीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. अशाप्रकारे एका लग्नापूर्वीच हे दोघे एका मुलीचे पालक झाले.
मग अद्याप लग्न का केले नाही?
गेल्या अनेक वर्षांपासून हे जोडपे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. साखरपूडा होऊनही या जोडप्याने अद्याप लग्न का केले नाही, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. एका मुलाखतीत बोलताना सुकी वॉटरहाऊसने त्यावर मत प्रदर्शित केले. कौटुंबिक जबाबदाऱ्यांसोबतच दोघांचेही चित्रपटांचे शुटिंग, म्युझिक टूरचे वेळापत्रक यामुळे दोघेही व्यग्र आहेत. कामाच्या या धावपळीत संतुलन साधण्यासाठी त्यांनी सध्या लग्न पुढे ढकल्याची माहिती त्यांनी दिली. आता रॉबर्ट पॅटिन्सन हा जेम्स बाँडच्या नवीन सीरीजमध्ये दिसणार असल्याने त्याची जोरदार होत आहे.
