AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित पवारांच्या आरोपाने राजकीय वातावरण ढवळलं; अजितदादा अपघात प्रकरणात भरणेंची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

रोहित पवारांच्या आरोपाने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. अजितदादा अपघात प्रकरणात दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी केली आहे.

रोहित पवारांच्या आरोपाने राजकीय वातावरण ढवळलं; अजितदादा अपघात प्रकरणात भरणेंची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी
datta bharne Image Credit source: tv9
| Updated on: Nov 17, 2026 | 12:57 PM
Share

आमदार रोहित पवार यांनी अजितदादा अपघात प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केला. रोहित पवारांच्या आरोपावरून राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. विमान मालकांना वाचवणारे मफलरमॅन देवेंद्र फडणवीसच असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला. रोहित पवारांचे आरोप भाजपने फेटाळून लावले आहेत. त्यानंतर आता अजितदादा अपघात प्रकरणात दत्तात्रय भरणे यांनी अपघाताचा अहवाल समोर आणावा, अशी मागणी करण्यात आली.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माधम्यांशी संवाद साधला. यावेळी रोहित पवारांच्या आरोपावर दत्तात्रय भरणे म्हणाले, ‘राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच देशाच्या गृहमंत्र्यांकडे विनंती केली की, अजित पवारांच्या अपघात प्रकरणाला 10 महिने झाले आहेत. आता तत्काळ अपघात प्रकरणचा अहवाल समोर आणावा.  अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस जवळचे मित्र होते. देवेंद्र फडणवीस यांचे दादांवर खूप प्रेम होतं. अजितदादा विरोधी पक्षात असताना सुद्धा त्यांचं अजित पवारांवर किती प्रेम होतं, ते मी पाहिलं होतं.  कुणीच या प्रकरणी राजकारण करू नये, लवकरात लवकर तपास पूर्ण होऊन सत्य बाहेर यावं. कुणाचा कुणासोबत फोटो समोर आला म्हणजे तो दोषी आहे असं नाही’.

दुष्काळावर भाष्य करत करताना म्हटलं की, ‘दुष्काळच वर्ष आहे. दिपावलीला शेतकऱ्यांना हातभार लावण्यासाठी ५ हजार मदत राज्य सरकारने केली आहे. १ कोटी १० लाख शेतकऱ्यांपैकी १ कोटी शेतकऱ्यांना ५ हजार रुपये मदत केली आहे. केंद्र सरकारकडून आधी जी जिरायती बागायती शेतीनुकसानासाठी असलेली रक्कम आता वाढवली आहे. केंद्र सरकारकडे सुधारित दुरुस्ती करून मदतीचा प्रस्ताव लवकरच पाठवण्यात येईल. मंत्रिमंडळ बैठकीत त्याला मंजुरी करून पाठवण्यात येईल. अडचणीच्या काळात जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न आमच्या वतीने केला जाईल. आपण अग्रिम मदत आधीच केलेली आहे. केंद्र सरकारकडे आपण लवकरच केंद्रकडून मिळणाऱ्या मदतीचा दुरुस्तीचा प्रस्ताव देणार आहोत. राज्य सरकार २ हजार देणार आहोत, असं काही नाही’.

Follow Us
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी उद्धव ठाकरेंकडून शक्तीस्थळी अभिवादन
Uddhav Thackeray : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी उद्धव ठाकरेंनी शक्तीस्थळी जाऊन केले अभिवादन!
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी एकनाथ शिंदेंकडून...
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी एकनाथ शिंदेंकडून अभिवाद; त्यांनी दिलेल्या मुलमंत्राचं स्मरण करत म्हणाले...
बच्चन बाप-बेट्याला बुलेटप्रूफमध्येही मारु! गोल्डी ढिल्लोच्या दाव्याने
Amitabh Bachchan Safety : बच्चन बाप-बेट्याला बुलेटप्रूफमध्येही मारु! गोल्डी ढिल्लोच्या दाव्याने खळबळ
मोठी बातमी! महाराष्ट्रातील आणखी 18 तालुके दुष्काळग्रस्त होणार? आज...
महाराष्ट्रातील आणखी 18 तालुके दुष्काळग्रस्त होणार? आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक!
ऑपरेशन टायगरवर आशिष जयस्वाल यांचे सूचक विधान; ठाकरे गटाच्या...
ऑपरेशन टायगरवर आशिष जयस्वाल यांचे सूचक विधान; ठाकरे गटाच्या नेतृत्वाबाबत काय म्हणाले?
छठपूजेनंतर महाराष्ट्रात काही ठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य! रामकुंड...
छठपूजेनंतर महाराष्ट्रात अस्वच्छतेचे साम्राज्य! रामकुंडाच्या पायऱ्यांवर आडनावे, समुद्रकिनाऱ्यांवर कचऱ्याचे ढीग
रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन; शेकडो कार्यकर्ते
Eknath shinde : रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन; शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
जळगाव जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून लढणार, दोन जागांचा तिढा कायम
Jalgaon : जळगाव जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून लढणार, दोन जागांचा तिढा कायम
मुंबईत प्रदूषणाचा विळखा! हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या...
मुंबईत प्रदूषणाचा विळखा! हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या आरोग्याची चिंता
SRA आरोपांवर प्रताप सरनाईक आक्रमक; संजय राऊतांना सुनावले...
SRA आरोपांवर प्रताप सरनाईक आक्रमक; संजय राऊतांना सुनावले, अपना घर घोटाळ्यावरही मोठा इशारा!