AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नशेतला व्यक्ती म्हणजे रोहित पवार; मफलर मॅन म्हणून फडणवीसांचा फोटो दाखवल्यानंतर भाजपची बोचरी टीका

रोहित पवार यांनी एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक मफलर घेतलेला फोटो दाखवला. मफलर घातलेल्या फोटोत त्यांच्या शेजारी व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांचे पुत्र रोहित सिंग हे उभे आहेत. यावर आता भाजपने उत्तर देत रोहित पवार यांना सुनावले आहे.

नशेतला व्यक्ती म्हणजे रोहित पवार; मफलर मॅन म्हणून फडणवीसांचा फोटो दाखवल्यानंतर भाजपची बोचरी टीका
Rohit PawarImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 17, 2026 | 12:26 PM
Share

सध्या राज्यातील राजकारण चांगलेच पेटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी नुकताच घेतलेल्या पत्रकार परिषदेत मफलर मॅनचा उल्लेख केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक मफलर घेतलेला फोटो दाखवला आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. फडणवीसा यांचा मफलर घातलेल्या फोटोत त्यांच्या शेजारी व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांचे पुत्र रोहित सिंग हे उभे आहेत. यामुळे आता नवा पेटला आहे. यावर भाजपने आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया देत रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

आशिष शेलार यांनी नुकताच एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसचा अंतर्गत विषय काय आहे हे जनतेला माहिती आहे. त्या वैफल्यग्रस्त स्थितीतून उद्भवलेली चिड आहे. ज्यावेळी अशी चिड वैफल्यग्रस्तस्थितीतून निर्माण होते त्यावेळी एक नशा येते. खोटं बोलण्याची नशा आणि त्या नशेमध्ये धुंद आता मी व्यक्तीवर बोलतोय अशा वैफल्यग्रस्त परिस्थितीतून उद्भवलेल्या चिडमधील नशेतला व्यक्ती म्हणजे रोहित पवार आहेत.

राहुल गांधीवर टीका

पुढे राहुल गांधींविषयी बोलताना ते म्हणाले की, काल पासून आपण पाहातोय की काँग्रेस आणि राहुल गांधीने सुप्रिय कोर्टात एक याचिका दाखल केली आहे. काही प्रश्न विचारावेत अशा प्रकारची माहिती समोर आली आहे. ते प्रश्न 30-40-45 किती आहेत हे मला माहिती नाही. पण विशेष रुपात काँग्रेस आणि राहुल गांधी हे खोट्याचे दुकान घेऊन एक वायू मंडळ उभे करणे आणि देशातील जनतेच्या समोर भ्रमीत, धुळीत प्रकारचा महौल उभा करणे ही त्यांची रणनीती आहे. प्रकरण कोर्टात आहे. कोर्टात याची चर्चा होईल आणि कोर्टात जे प्रकरण आहे त्यावर उघडपणे असे बोलणे हे आज योग्य नाही. पण आज ज्या प्रकारचे वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न न्यायालयीन प्रक्रियेतून निर्माण केलेल्या प्रश्नांच्या आधारावर केले जात आहेत. त्या 30-40-45 प्रश्नांच्या समोर आम्ही सहा प्रश्न राहुल गांधी, काँग्रेसला विचारू इच्छितो. हिंमत असेल तर उत्तर द्या.

राहुल गांधीना प्रश्न

“पहिला प्रश्न सरळ आहे जो प्रश्न तुम्ही न्यायालयासमोर याचिकेच्या माध्यमातून ठेवत आहात तो तुमचा अधिकार असू शकतो. पण अशाच प्रकारचे प्रश्न आणि चर्चा तुम्ही राहुल गांधी आणि काँग्रेसने संसदेत का नाही केले? संसदेत तुम्ही किंवा तुमचे सदस्य का चर्चा करत नाहीत? काय कारण होते? दुसरा प्रश्न हे जे काही प्रश्न आहेत जे न्यायालयासमोर याचिका केली आहे त्यामध्ये ज्या प्रकारे बोलले गेलं त्या प्रकारची सुचना, बोलणं किंवा प्रश्न तुमच्या काँग्रेस पार्टीच्या बीएलए 2 ने निवडणुक अधिकारी कोणत्याही पदावरील असूदेत त्यांच्यासमोर ठेवले होते का? का नाही ठेवले?” असे आशिष शेलार म्हणाले.

Follow Us
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी एकनाथ शिंदेंकडून...
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी एकनाथ शिंदेंकडून अभिवाद; त्यांनी दिलेल्या मुलमंत्राचं स्मरण करत म्हणाले...
बच्चन बाप-बेट्याला बुलेटप्रूफमध्येही मारु! गोल्डी ढिल्लोच्या दाव्याने
Amitabh Bachchan Safety : बच्चन बाप-बेट्याला बुलेटप्रूफमध्येही मारु! गोल्डी ढिल्लोच्या दाव्याने खळबळ
मोठी बातमी! महाराष्ट्रातील आणखी 18 तालुके दुष्काळग्रस्त होणार? आज...
महाराष्ट्रातील आणखी 18 तालुके दुष्काळग्रस्त होणार? आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक!
ऑपरेशन टायगरवर आशिष जयस्वाल यांचे सूचक विधान; ठाकरे गटाच्या...
ऑपरेशन टायगरवर आशिष जयस्वाल यांचे सूचक विधान; ठाकरे गटाच्या नेतृत्वाबाबत काय म्हणाले?
छठपूजेनंतर महाराष्ट्रात काही ठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य! रामकुंड...
छठपूजेनंतर महाराष्ट्रात अस्वच्छतेचे साम्राज्य! रामकुंडाच्या पायऱ्यांवर आडनावे, समुद्रकिनाऱ्यांवर कचऱ्याचे ढीग
रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन; शेकडो कार्यकर्ते
Eknath shinde : रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन; शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
जळगाव जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून लढणार, दोन जागांचा तिढा कायम
Jalgaon : जळगाव जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून लढणार, दोन जागांचा तिढा कायम
मुंबईत प्रदूषणाचा विळखा! हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या...
मुंबईत प्रदूषणाचा विळखा! हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या आरोग्याची चिंता
SRA आरोपांवर प्रताप सरनाईक आक्रमक; संजय राऊतांना सुनावले...
SRA आरोपांवर प्रताप सरनाईक आक्रमक; संजय राऊतांना सुनावले, अपना घर घोटाळ्यावरही मोठा इशारा!
शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुनावणीची शक्यता...
Shivsena Hearing Update : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुनावणीची शक्यता