TVS मधील वाद विकोपाला, मुलीने वडिलांकडे मागितला संपत्तीत वाटा, थेट कायदेशीर नोटीस पाठवत…
Laksmi Venu -Venu Shrinivas TVS: टीव्हीएस समूहात संपत्तीवरून घमासान सुरू आहे. वेणु श्रीनिवासन यांची मुलगी लक्ष्मी वेणु हिने कुटुंबातील संपत्तीवर हक्क सांगितला आणि वाटा मागितला. हा वाद कोर्टापर्यंत जाण्याची शक्यता आहे.

Laksmi Venu -Venu Shrinivas TVS: देशातील मोठ्या व्यावसायिक कुटुंबापैकी एक TVS ग्रुप कुटुंबियांत संपत्तीवरून घमासान सुरू आहे. हा वाद आता एका कायदेशीर वळणावर पोहचला आहे. उद्योगपती वेणु श्रीनिवासन यांची मुलगी लक्ष्मी वेणु हिने कुटुंबाच्या मालकीच्या संयुक्त संपत्तीचे वाटेहिस्से करण्याचे, फोड करण्याची मागणी केली आहे. त्यांनी वडिलांनाच थेट नोटीस पाठवली. कुटुंबाचा व्यवसाय, व्यापार आणि संपत्तीत मुलींना समान अधिकार मिळावा असा मुद्दा त्यांनी लावून धरला. या वादात मुलीच्या बाजूने आईनेही उडी घेतली आहे. मल्लिका श्रीनिवासन यांनी मुलीच्या दाव्याला पाठिंबा दिला.
काय आहे हा वाद?
भारताचा प्रमुख ऑटोमोबाईल व्यावसायिक समूह TVS कुटुंबाच्या संपत्तीत मोठा वाद उफाळला आहे. संपत्तीच्या वाटेहिशावरून वाद सुरू आहे. हा वाद आता नवीन वळणावर पोहचला आहे. TVS Motor Company चे अध्यक्ष एमेरिटस वेणु श्रीनिवासन यांची मुलगी लक्ष्मी वेणु हिने वडिलांना एक औपचारिक कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यात कुटुंबाच्या संयुक्त मालमत्तांवर हक्क सांगितला आहे. तर मुलींनाही संपत्ती समान हक्क देण्याची वकिली केली आहे.
हिंदू उत्तराधिकारी कायद्यातंर्गत त्यांना कुटुंबाच्या संयुक्त मालमत्तेवर कायदेशीर हक्क मागण्याचा अधिकार असल्याचा दावा लक्ष्मी यांनी केला आहे. त्यांचा आरोप आहे की, कुटुंबात, व्यवसायातच नाही तर संपत्तीतही त्यांचा भाऊ सुदर्शन वेणु याला प्राथमिकता देण्यात आली. तर त्यांची बोळवण करण्यात आली. हा केवळ कौटुंबिक वाद नाही. तर यामुळे TVS समूहातील विविध कंपन्या, कुटुंबातील वाटेहिस्सा आणि भविष्यातील व्यावसायिक नियंत्रण यामागील गणितं आहेत.
कोणत्या कंपन्या आणि संपत्तीत वाटा मागत आहेत लक्ष्मी वेणु?
टीव्हीएस होल्डिंग : या समुहाची प्रमुख होल्डिंग कंपनी
टीव्हीएस मोटर कंपनी: दुचाकी आणि तीन चाकी तयार करणारी कंपनी
टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेज: आर्थिक सेवा आणि कर्जाशी संबंधित व्यापार, व्यवसाय
सुंदरम क्लेटन: औद्योगिक आणि ऑटोमोटिव कंपोनेंट व्यावसायाशी संबंधित कंपनी
व्हीएस ट्रस्ट: कुटुंबाच्या व्यावसायिक हित आणि संपत्तीशी संबंधित ट्रस्ट
2020 मध्ये TVS कुटुंबामध्ये वाटणी, मग आता वाद का?
2020 मध्ये TVS व्यवसाय, व्यापार आणि कारभाराविषयी मोठा निर्णय घेण्यात आला. टीव्हीएस कुटुंबातील विविध सदस्याकडे काही तरी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कुटुंबातील विविध व्यक्तींकडे व्यावसायिक जबाबदारी सोपवत संपत्तीच्या वाटणीसंबंधी एक व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे प्रत्येक व्यवसायाकडे अधिक लक्ष देऊन त्याला आर्थिक पाठबळ मिळणे हा त्यामागील उद्देश आहे.
पण लक्ष्मी वेणु यांच्या मते 2020 मध्ये झालेला हा करार टीव्हीएस कुटुंबातील विविध घटकांमध्ये झाला होता. म्हणजे संबंधित विविध नातेवाईकांमध्ये झाले होता. पण वेणु श्रीनिवास यांच्या कुटुंबाच्या संपत्तीत अशी वाटणी झाली नाही. त्यांच्या मते कुटुंबातंर्गत संपत्तीत कोणतीही वाटणी झाली नाही. हेच वादाचे मूळ कारण आहे.
