AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुप्रिया सुळे यांचे मोठे भाष्य, थेट म्हटले, तुमच्या हक्काचे पैसे..

रोहित पवार यांनी काल पत्रकार परिषत घेत गंभीर आरोप केले. हेच नाही तर त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले. फडणवीसांचे नाव रोहित पवार यांनी घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला. त्यातच आता सुप्रिया सुळे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली.

सुप्रिया सुळे यांचे मोठे भाष्य, थेट म्हटले, तुमच्या हक्काचे पैसे..
Supriya Sule
| Updated on: Nov 17, 2026 | 12:07 PM
Share

राज्याचे माजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात गंभीर आरोप केले जात आहेत. रोहित पवार यांनी काल थेट या प्रकरणात विमान कंपनीच्या मालकाची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे म्हटले. हेच नाही तर मफलरमधील जो फोटो होता, तो फडणवीसांचाच असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. यासोबतच फडणवीस यांचा एक फोटोही त्यांनी शेअर केला. रोहित पवार यांनी थेट फडणवीसांवर आरोप केल्याने भाजपाच्या नेत्यांकडून रोहित पवार यांचा समाचार घेतला जात आहे. रोहित पवार यांच्यावर कडाडून टीका केली जात आहे. त्यातच आता सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, माझी विनंती आहे ज्या लोकांच्या खात्यावर 5 हजार आले नाहीत, अशांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जावे. ते तुमच्या हक्काचे पैसे आहेत. याकरिता आम्ही पाठपुरवठा करत आहोत.

फळबागांना टॅंकरची मागणी शरद पवार यांनी केली होती, त्याकरिता पाठपुरवठा करत आहोत. हिंजवडी आणि पुण्यातील वाहतूक कोडींच्या विषयात पुणे महापालिका आयुक्तांकडे मी जाणार आहे. पुण्याच्या प्रश्नावर बोलताना सुप्रिया सुळे दिसल्या. यादरम्यान त्यांनी रोहित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर भाष्य करणे टाळले.

या मुद्द्या सुप्रिया सुळे नक्की काय बोलणार याकडे सगळ्यांच्या नजरा होत्या. मात्र, सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील प्रश्नावरच भाष्य केले. रोहित पवार यांच्याकडून ज्या प्रकारे आरोप केले जात आहेत, ज्यानंतर एकच खळबळ उडाली. आता त्यांनी फडणवीस यांचे नाव घेतले. अजित पवार यांच्या अपघात प्रकरणात सातत्याने रोहित पवार आवाज उठवताना दिसत आहेत.

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा काही दिवसांपासून रंगत होती. त्या चर्चांवर स्पष्ट भाष्य करताना सुप्रिया सुळे या दिसल्या होत्या. सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते की, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू होती. पण माझा भाऊ गेला आणि तिथेच चर्चा संपल्या आहेत. तो विषय आमच्यासाठी तिथेच संपलेला आहे.

Follow Us
बच्चन बाप-बेट्याला बुलेटप्रूफमध्येही मारु! गोल्डी ढिल्लोच्या दाव्याने
Amitabh Bachchan Safety : बच्चन बाप-बेट्याला बुलेटप्रूफमध्येही मारु! गोल्डी ढिल्लोच्या दाव्याने खळबळ
मोठी बातमी! महाराष्ट्रातील आणखी 18 तालुके दुष्काळग्रस्त होणार? आज...
महाराष्ट्रातील आणखी 18 तालुके दुष्काळग्रस्त होणार? आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक!
ऑपरेशन टायगरवर आशिष जयस्वाल यांचे सूचक विधान; ठाकरे गटाच्या...
ऑपरेशन टायगरवर आशिष जयस्वाल यांचे सूचक विधान; ठाकरे गटाच्या नेतृत्वाबाबत काय म्हणाले?
छठपूजेनंतर महाराष्ट्रात काही ठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य! रामकुंड...
छठपूजेनंतर महाराष्ट्रात अस्वच्छतेचे साम्राज्य! रामकुंडाच्या पायऱ्यांवर आडनावे, समुद्रकिनाऱ्यांवर कचऱ्याचे ढीग
रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन; शेकडो कार्यकर्ते
Eknath shinde : रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन; शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
जळगाव जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून लढणार, दोन जागांचा तिढा कायम
Jalgaon : जळगाव जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून लढणार, दोन जागांचा तिढा कायम
मुंबईत प्रदूषणाचा विळखा! हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या...
मुंबईत प्रदूषणाचा विळखा! हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या आरोग्याची चिंता
SRA आरोपांवर प्रताप सरनाईक आक्रमक; संजय राऊतांना सुनावले...
SRA आरोपांवर प्रताप सरनाईक आक्रमक; संजय राऊतांना सुनावले, अपना घर घोटाळ्यावरही मोठा इशारा!
शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुनावणीची शक्यता...
Shivsena Hearing Update : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुनावणीची शक्यता
बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन; ठाकरे बंधू एकत्र दिसणार?
Balasaheb Thackeray Smrutidin : बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन; ठाकरे बंधू एकत्र दिसणार?