AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार गटाला धक्का, प्रफुल्ल पटेलांनी गेम फिरवला, राष्ट्रवादी अजित पवार गटात मोठा पक्षप्रवेश

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आता आणखी एक मोठा धक्का राष्ट्रवादी शरद पवार गटाला देण्यात आला आहे. पक्षात मोठा पक्ष प्रवेश झाला आहे.

शरद पवार गटाला धक्का, प्रफुल्ल पटेलांनी गेम फिरवला, राष्ट्रवादी अजित पवार गटात मोठा पक्षप्रवेश
राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 16, 2026 | 3:01 PM
Share

लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणूकीत हे यश महाविकास आघाडीला टिकवता आलं नाही. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला, आणि पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार आलं. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला देखील मोठं यश मिळालं होतं. दरम्यान या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला मोठी गळती लागल्याचं पहायला मिळत आहे. अनेक बड्या नेत्यांनी महाविकास आघाडीमधून महायुतीमध्ये प्रवेश केला. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला. शिवसेना ठाकरे गटानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटातील अनेक नेत्यांनी देखील पक्षाची साथ सोडली. यातील अनेकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला.

दरम्यान आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का बसला आहे. भंडारा जिल्ह्यातील मोहाडीत तीन नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात या नगरसेवकांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. दरम्यान या पक्षप्रवेशामुळे मोहाडी गटात आता राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद वाढली आहे. यावेळी बोलताना आता सर्वांनी एकजुटीनं काम करा असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.

शिवसेना ठाकरे गटालाही धक्का 

दरम्यान दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाला देखील धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आनंद दुबे यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटामधील आपल्या सर्व पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश होणार आहे. आनंद दुबे हे शिवसेना ठाकरे गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते होते. त्यांनी शिवसेना ठाकरे गट सोडताना पक्षावर अनेक आरोप देखील केले आहेत. त्यानंतर ते आता शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

Follow Us
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....
कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
Kunal Kamra : कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता