AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पायात काळा धागा बांधताय! माहितीये 9 गाठींचं काय आहेत नियम, शुभ मुहूर्तांबद्दल घ्या जाणून

अनेक मुलींना पायात काळा धागा बांधायला आवडतं. पण पायात काळा धागा बांधण्याचे देखील काही नियम आहेत. यामागे शास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार, पायाला काळा धागा बांधण्यामागे भक्कम आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारणे आहेत. तर जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त...

पायात काळा धागा बांधताय! माहितीये 9 गाठींचं काय आहेत नियम, शुभ मुहूर्तांबद्दल घ्या जाणून
| Updated on: Nov 17, 2026 | 12:03 PM
Share

हिंदू धर्मात शास्त्र आणि ज्योतिषशास्त्राला फार महत्त्व आहे. सांगायचं झालं तर, अनेक जण पायात काळा धागा बांधतात. आता पाहायचं झालं तर, काळा दाखल अनेक जण पायात बांधतात, आजची तरुण पिढी फॅशन म्हणूनही पायात काळा धागा बांधते. पण, शास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार, पायाला काळा धागा बांधण्यामागे भक्कम आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारणं आहेत.  असं देखील सांगितलं जातं की, आपल्या सभोवतालच्या नकारात्मक ऊर्जा आणि दृष्टदोषापासून आपले संरक्षण करण्यासाठी काळा धागा बांधला जातो. काही लोकांना संध्याकाळी विनाकारण खूप थकवा जाणवणे, वारंवार आजारी पडणे किंवा कामात गती मंदावणे यांसारख्या समस्या येतात. अशा परिस्थितीत, शरीरातील सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि दृष्टदोषाचा प्रभाव टाळण्यासाठी पायाला काळा धागा बांधण्याचा सल्ला दिला जातो.

कालभैरव आणि नऊ ग्रहांमधील संबंध:

काशी परंपरेनुसार, या काळ्या धाग्याला ‘काशी दारा’ असंही म्हटलं जातं. धार्मिक श्रद्धेनुसार, काळा धागा हा संरक्षक देव कालभैरवाचे प्रतीक आहे. तसेच, ज्योतिषशास्त्रानुसार असं मानलं जातं की, शनी ग्रह व्यक्तीच्या जीवनात पायांमार्फत प्रवेश करतो. त्यामुळे, पायांना काळा धागा बांधल्याने कुंडलीतील शनी, राहू आणि केतू या ग्रहांचे दोष कमी होऊ शकतात आणि त्यांच्या अशुभ प्रभावापासून सुटका मिळू शकते.

काळा धागा पायात बांधण्याचे फायदे आहेत, म्हणून धागा पायात बांधताना काही नियम पाळणं फार महत्त्वाचं आहे. काळ्या धाग्याला नऊ गाठी असाव्यात, ज्या आपल्या शरीराच्या नऊ दरवाजांचे प्रतीक आहेत. पुरुष आणि मुलांनी काळा धागा त्यांच्या उजव्या पायावर बांधावा. स्त्रिया आणि मुलींनी तो त्यांच्या डाव्या पायावर बांधणे शुभ मानले जाते. शनिवारी संध्याकाळी काळा धागा बांधणे अत्यंत शुभ मानले जाते. धागा बांधताना मनात चांगला हेतू आणि सकारात्मक विचार ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.

काळ्या धाग्याचा हार घालण्याचे महत्त्व

अनेक स्त्रिया आणि मुली पायात काळ्या धाग्यासह चांदीचे किंवा पायराइटचे पैंजण घालतात. धर्मग्रंथ आणि मान्यतेनुसार, अशी दृढ श्रद्धा आहे की काळ्या धाग्यासह असे पैंजण घातल्याने नकारात्मक ऊर्जा आणि वाईट दृष्टी दूर होते आणि घरात व जीवनात धन-संपत्ती आकर्षित होते.

(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Follow Us
बच्चन बाप-बेट्याला बुलेटप्रूफमध्येही मारु! गोल्डी ढिल्लोच्या दाव्याने
Amitabh Bachchan Safety : बच्चन बाप-बेट्याला बुलेटप्रूफमध्येही मारु! गोल्डी ढिल्लोच्या दाव्याने खळबळ
मोठी बातमी! महाराष्ट्रातील आणखी 18 तालुके दुष्काळग्रस्त होणार? आज...
महाराष्ट्रातील आणखी 18 तालुके दुष्काळग्रस्त होणार? आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक!
ऑपरेशन टायगरवर आशिष जयस्वाल यांचे सूचक विधान; ठाकरे गटाच्या...
ऑपरेशन टायगरवर आशिष जयस्वाल यांचे सूचक विधान; ठाकरे गटाच्या नेतृत्वाबाबत काय म्हणाले?
छठपूजेनंतर महाराष्ट्रात काही ठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य! रामकुंड...
छठपूजेनंतर महाराष्ट्रात अस्वच्छतेचे साम्राज्य! रामकुंडाच्या पायऱ्यांवर आडनावे, समुद्रकिनाऱ्यांवर कचऱ्याचे ढीग
रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन; शेकडो कार्यकर्ते
Eknath shinde : रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन; शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
जळगाव जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून लढणार, दोन जागांचा तिढा कायम
Jalgaon : जळगाव जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून लढणार, दोन जागांचा तिढा कायम
मुंबईत प्रदूषणाचा विळखा! हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या...
मुंबईत प्रदूषणाचा विळखा! हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या आरोग्याची चिंता
SRA आरोपांवर प्रताप सरनाईक आक्रमक; संजय राऊतांना सुनावले...
SRA आरोपांवर प्रताप सरनाईक आक्रमक; संजय राऊतांना सुनावले, अपना घर घोटाळ्यावरही मोठा इशारा!
शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुनावणीची शक्यता...
Shivsena Hearing Update : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुनावणीची शक्यता
बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन; ठाकरे बंधू एकत्र दिसणार?
Balasaheb Thackeray Smrutidin : बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन; ठाकरे बंधू एकत्र दिसणार?